मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या निवृत्तीनंतर कोणाची वर्णी लागणार, याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर असलेले प्रवीणसिंह परदेशी यांच्यात मुख्य सचिवपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Chief Secretary post Sitaram Kunte or Praveen Singh Pardeshi)
मुख्य सचिव संजय कुमार पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वर्णी लावण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याची चर्चा मंत्रालयात आहे. सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर प्रवीणसिंह परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर आहेत.
कोण आहेत प्रवीण परदेशी?
कुंटे आणि परदेशी एकाच बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दोघेही येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. म्हणजेच दोघांपैकी एकाची नियुक्ती झाली, तर मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांचाच असेल. (Maharashtra Chief Secretary post Sitaram Kunte or Praveen Singh Pardeshi)
मुख्य सचिवासारख्या महत्त्वाच्या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांची निवडही महत्त्वाची मानली जाते.
महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटीचे (रेरा) अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. त्यानंतर
विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांची निवृत्तीनंतर ‘रेरा’चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील महिन्यात निवृत्त होत असलेले एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव हेही याच पदासाठी इच्छुक असल्याचे मानले जाते. चॅटर्जी यांचीही निवृत्तीनंतर महारेरामध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
राजू शेट्टींचा मुद्द्याला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात
(Maharashtra Chief Secretary post Sitaram Kunte or Praveen Singh Pardeshi)