मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. (Maharashtra Cold Season Temperature decreasing in many place)
पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरला आहे. त्यामुळे पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.
दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही तापमानाचा पारा घसरला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे मुंबईतील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
राज्यात हिवाळ्याची चाहुल, किमान तापमानात घसरण
NASIK 11.1℃
PARBHANI 10.6°C
PARBHANI AGRI UNIV 8.8°C
PUNE 11.5°C
SANTACRUZ 18.4°C (This season’s lowest so far)
JALGAON 12.6°C
BARAMATI 11.9 °C
AURANGABAD 13.0°C
GONDIA 10.5°C
NAGPUR 12.4°C
अन्य बऱ्याच ठिकाणी तापमान अंशाच्या खाली.— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 5, 2020
(Maharashtra Cold Season Temperature decreasing in many place)
संबंधित बातम्या :
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद