मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. अशावेळी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ आजही कायम आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 67 हजार 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 62 हजार 298 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललाय. आज दिवसभरात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. (67 thousand 13 new patients, while 568 people died due to corona)
आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 40 लाख 94 हजार 840 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 33 लाख 30 हजार 747 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 99 हजार 858 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में #COVID19 के 67,013 नए मामले सामने आए हैं। 62,298 लोग डिस्चार्ज हुए और 568 लोगों की मृत्यु दर्ज़ की गई।
कुल मामले: 40,94,840
सक्रिय मामले: 6,99,858
कुल डिस्चार्ज: 33,30,747 pic.twitter.com/u3FDBzlon8
— ANI_HindiNews (@AHindinews) April 22, 2021
मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातूर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात मुंबईत 8 हजार 90 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 7 हजार 410 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा मुंबईतील दर 84 टक्के आहे. मुंबईत सध्या 83 हजार 953 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 50 दिवसांवर पोहोचलाय. दरम्यान, मुंबईतील मृतांची संख्या मात्र चिंताजनक बनत चालली आहे. मुंबईत आज दिवसभरात 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
#CoronavirusUpdates
२२ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण -७४१०
२४ तासात बरे झालेले रुग्ण-८०९०
बरे झालेले एकूण रुग्ण- ५,११,१४३
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८४%एकूण सक्रिय रुग्ण-८३,९५३
दुप्पटीचा दर- ५० दिवस
कोविड वाढीचा दर (१५ एप्रिल-२१ एप्रिल)- १.३५%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 22, 2021
पुणे महापालिका हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज पुण्यात 4 हजार 851 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 हजार 539 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुण्यातील मृतांची संख्या चिंताजनक बनली आहे. पुण्यात आज दिवसभरात 80 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 24 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 51 हजार 552 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 313 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आजच्या आकडेवारीनुसार पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 87 हजार 30 वर पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 29 जार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
दिवसभरात नवे ४ हजार ५३९ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ५३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ८७ हजार ०३० इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 22, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra Strict Lockdown: ब्रेक द चेन; आजपासून कडक निर्बंध, नवे नियम काय?
Video : ऑक्सिजनची कमतरता, रुग्ण मृत्यूच्या दाढेत, रुग्णालयाचे हतबल सीईओ ढसाढसा रडले!
Today, 67 thousand 13 new patients, while 568 people died due to corona