मुंबई : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस मेहनत घेत असल्या तरी, कोरोना रुग्ण कमी होताना दिसत नाहीयेत. राज्यात आज (maharashtra corona update) दिवसभरात तब्बल 8807 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी हा आकडा 6218 एवढा होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज तब्बल 2500 कोरोना रुग्ण जास्त आढळले आहेत. रुग्णवाढीच्या या चढत्या आलेखामुळे सर्वजण धास्तावले असून ही रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. (maharashtra corona update corona patient daily report)
राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. आज दिवसभरात कोरोनाचे 8807 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण 80 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर 2.45 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10427 एवढी आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कालच्या तुलनेत 94.70 टक्क्यांवर आले आहे. कालच्या तुलनेत हे प्रमाण 0.26 टक्क्यांनी कमी झाले आहे.
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. मुंबईमध्ये सध्या 6900 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या 6552 वर पोहोचली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असून हा आकडा 10427 वर पोहोचला आहे. नाशिक, जळगावमध्ये सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या अनुक्रमे 1765 आणि 1749 एवढी आहे. अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्येसुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाचे 6178 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाल थोपवण्यासाठी सध्या देशपातळीवर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. मात्र, लस घेतली असूनसुद्धा काही जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आलेय. पिंपरी चिंचवडमध्ये लस घेतलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिलीये.
पुण्यात खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिका खबरदारी म्हणून कठोर निर्णय घेत आहे. पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रूग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबीच पालिका आयुक्तांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्णांत रोज वाढ होताना दिसते आहे. कालच्या तुलनेत आज 2500 जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील निर्बंध आणखी कडक केले जातात की काय?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच लस घेतली असली तरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवरसुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
इतर बातम्या :
मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार, प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड सेंटरचीही उभारणी
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, प्रशासनाकडे पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? वाचा सविस्तर रिपोर्ट
(maharashtra corona update corona patient daily report)