मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येचा शनिवारी नवा रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 27 हजार 127 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 हजार 588 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्येही शनिवारी वाढ पाहायला मिळत आहे. शनिवारी एकूण 97 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 6 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.(Corona report positive of 27 thousand 127 people in Maharashtra on Saturday)
महाराष्ट्रात आतापर्यंत 24 लाख 49 हजार 147 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 22 लाख 3 हजार 553 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर 53 हजार 300 जणांचा कोरोनांमुळे मृत्यू झालाय.
मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घ्यायचा झाला तर आज 2 हजार 982 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 780 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 5 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनत जात आहे. पुण्यात दिवसभरात 3 हजार 111 जणांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 1 हजार 94 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आज 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 रुग्ण हे पुणे शहराबाहेरील होते. पुण्यात सध्या 20 हजार 889 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 538 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल 76.22 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. यात महाराष्ट्रात तब्बल 62 टक्के, केरळमध्ये 8.83 टक्के तर पंबाजमध्ये 5.36 टक्के रुग्ण आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 81.38 टक्के मृत्यू हे 5 राज्यांमध्ये आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 70 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर पंजाबमध्ये 38, केरळमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे – 37 हजार 384
नागपूर – 25 हजार 861
मुंबई – 18 हजार 850
ठाणे – 16 हजार 735
नाशिक – 11 हजार 867
एर्नाकुलम – 2 हजार 673
पठानमथिट्टा – 2 हजार 482
कन्नूर – 2 हजार 263
पलक्कड – 2 हजार 147
त्रिशूर – 2 हजार 65
जालंधर – 2 हजार 131
एसएएस नगर – 1 हजार 868
पटियाला – 1 हजार 685
लुधियाना – 1 हजार 643
होशियारपूर – 1 572
संबंधित बातम्या :
VIDEO: विनामास्क फिरताना रोखलं, महिलेकडून क्लीनअप मार्शललाच मारहाण
Corona report positive of 27 thousand 127 people in Maharashtra on Saturday