मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या शहरांतील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण आढळून आले आहेत. आज नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22 लाख 34 हजार 330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 15 हजार 241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.(24 thousand 645 people in the Maharashtra tested corona Positive)
दरम्यान, काल राज्यात कोरोनाचा स्फोट पाहायला मिळाला. काल दिवसभरात तब्बल 30 हजार 535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. तर 11 हजार 314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते. तर 90 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मुंबईत आज कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 3 हजार 260 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 223 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृत रुग्णांपैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिला रुग्णाचा समावेश होता.
#CoronavirusUpdates
२२ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/mpL8nUIzVZ— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 22, 2021
पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात 2 हजार 342 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 1 हजार 789 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुण्यात सध्या 524 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 65 आहे.
दिवसभरात नवे २ हजार ३४२ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने २ हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ३७ हजार ७३६ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 22, 2021
नागपुरात आज दिवसभरात 3 हजार 595 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नागपुरात आज दिवसभरात 1 हजार 837 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या रुग्णांसह नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 19 लाख 6 हजार 676 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 945 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातील एकूण 4 हजार 664 जणांचा कोरोनांमुळे मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्येही गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत नांदेडमध्ये 1 हजार 219 जणांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. नांदेड जिल्ह्यात सध्या 6 हजार 264 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 59 रुग्ण गंभीर आहेत.
Pune Corona | पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करणार, महापौरांची माहिती
24 thousand 645 people in the Maharashtra tested corona Positive