जालना : कोरोनाचे नवे प्रकार आणि त्यामुळे होणारे नवनवे आजार आता समोर येत आहेत. अशावेळी म्युकरमायकोसिस नावाचा एक बुरशीजन्य आजार कोरोना रुग्णांमध्ये आढळून येत आहे. सुरतमध्ये दोन दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिसचे 40 रुग्ण आढळून आले होते. तर त्याच दिवशी या आजाराची लागण झालेल्या 8 रुग्णांचे डोळे काढावे लागले होते. या आजाराबाबत ठाकरे सरकारनं मोठी घोषणा केली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. (Inclusion of mucormycosis disease in Mahatma Phule Jan Arogya Yojana, says Rajesh Tope)
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर योग्य वेळी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ठाकरे सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
या गोष्टींमध्ये काळजी घेतली नाही तर म्युकरमायकोसिसचा धोका
म्युकर मायकोसिस हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे लोक मोठा काळ आपल्या इतर आजारांचा उपचार घेत आहेत त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. श्वासोच्छवासाद्वारे हे जंतू नाकातून फुफुसात पोहचतात.
म्युकरमायकोसिसची लक्षणं काय?
डोळे किंवा नाक किंवा दोन्हींच्या आजूबाजूला लालसरपणा आणि वेदना होणे
ताप
डोकेदुखी
खोकला
दम लागणे
रक्ताच्या उलट्या
तणाव
काय काळजी घ्याल?
जर धुळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकामाच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा.
मातीत काम करण्याआधी बूट, लांब पँट आणि लांब बाह्यांचा शर्ट आणि हातात ग्लोव्ह्ज घाला.
व्यक्तिगत स्वच्छता पाळा त्यासाठी संपूर्ण शरीर घासून अंघोळ करा.
म्युकरमायकोसिस झाल्याचा संशय कधी घ्यावा?
नाकबंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचं हाड दुखणे
चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे, सूज येणे
दात दुखणे, दात हलणे किंवा पडणे, जबडा दुखणे
अंधुक दिसणे, डोळे दुखणे, वेदना होणे
छाती दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे
संबंधित बातम्या :
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?
Inclusion of mucormycosis disease in Mahatma Phule Jan Arogya Yojana, says Rajesh Tope