Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती? आरोग्यमंत्र्यांचे संकेत, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णयाची शक्यता

| Updated on: Apr 27, 2022 | 3:29 PM

मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात येऊ शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. तसंच राज्यात टेस्टिंगमध्ये वाढ, गरज भासल्यास जिनोमिक सिक्वेन्सिंग, ट्रॅक टेस्ट आणि लसीकरणात वाढ करण्यात येणार असल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.

Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती? आरोग्यमंत्र्यांचे संकेत, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णयाची शक्यता
मास्क
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात आरोग्यमंत्रीही सहभागी झाले होते. या बैठकीत जगातील कोरोना स्थिती, जगाच्या तुलनेत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव याबाबत चर्चा आणि प्रझेंटेशनही झालं. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत मास्क वापराबाबत चर्चा होऊ शकते. मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात येऊ शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. तसंच राज्यात टेस्टिंगमध्ये वाढ, गरज भासल्यास जिनोमिक सिक्वेन्सिंग, ट्रॅक टेस्ट आणि लसीकरणात वाढ करण्यात येणार असल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.

6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी

देशात आता 6 ते 12 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याची परवानगी आयसीएमआरने दिली आहे. त्यासाठीचे डिटेल रुल्स अद्याप पाठवलेले नाहीत. जसे ते येतील त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करेल, असंही टोपे यांनी सांगितलं. साधारणपणे 12 – 15 आणि 15 – 17 हा शाळेत जाणाऱ्या वयोगटाच्या लसीकरणाबाबत आपण देशाच्या सरसरीच्या तुलनेत कमी आहोत. त्यामुळे पालक आणि शाळांना विश्वासात घेऊन त्या वयोगटातील लसीकरण वाढवायचं आहे. प्रिकॉशन डोससाठी जनजागृती करणार आहोत. सर्वांनी प्रिकॉशन डोस घ्यावेत, अशी विनंतीही राजेश टोपे यांनी यावेळी केली.

मास्क सक्ती नाही पण मास्कसाठी आग्रही

महत्वाची बाब म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक केला जाऊ शकतो. संध्याकाळी मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर मास्कबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती टोपे यांनी दिलीय. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारणीला सुरुवात केलीय. आपण सक्ती जरी करत नसलो तरी त्याबाबत आग्रही राहण्याची शक्यता आहे. इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्सीबिलिटी प्रोगॅममध्ये लागणाऱ्या खर्चात महाराष्ट्र देशाच्या सरकारीच्या तुलनेत नक्कीच पुढे आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याबाबत चर्चा झाली. कोविडबाबतची सगळी यंत्रणा तयार राहावी याबाबत निर्देश देण्यात येतील, असंही टोपे म्हणाले.

इतर बातम्या :

Pravin Darekar: तर सोमय्यांची हत्याच झाली असती, राज्यपाल भेटीनंतर दरेकरांचा दावा

Narendra Modi : महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगालने इंधनावरील कर कमी करावा; मोदींनी बिगर भाजपशासित राज्यांना सुनावलं