मुंबई : आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात साजरा करता येणारा दिवस म्हणजे 1 मे. यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. यानिमित्ताने राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. (Maharashtra Day 2021 Politicians wishes)
महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा 1 मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले आहे. गेल्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन आहे. पण कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील सर्वात प्रगतीशील व पुरोगामी विचारांचे राज्य असलेला आपला महाराष्ट्र नेहमीच देशाच्या विकासात्मक जडणघडणीत अग्रेसर राहिला आहे. आज राज्य एका वैश्विक आपदेशी लढत असताना पुन्हा एकदा आपल्या एकजुटीची व लढाऊ बाण्याची प्रचिती देऊया. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/hkk0ce5pUE
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 1, 2021
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशामहाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा
Greetings to all on the occasion of the 61st anniversary of the formation of the State of Maharashtra pic.twitter.com/gVtcGgd97P
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 1, 2021
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) May 1, 2021
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!#१मे pic.twitter.com/uPt2sws8vY
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 1, 2021
१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र दिनी संकल्प करूया, कोरोनाची साखळी तोडून कोरोनावर मात करुया.#महाराष्ट्रदिन#MaharashtraDay pic.twitter.com/dNusP2ycUt— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 1, 2021
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानातून आपला महाराष्ट्र साकारलाय! त्या हुतात्म्यांचे स्मरण करून पुरोगामी महाराष्ट्राला आणखी सक्षम व बलशाली करण्याचा निर्धार करूया! महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/gJKY8lWCVR
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 1, 2021
राकट देशा, कणखर देशा असं वर्णन केल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या असंख्य कामगारांचे अगणित हात लागले त्या सर्व कामगारांना, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!#LabourDay #कामगारदिन pic.twitter.com/y35ykEtz4O
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 1, 2021
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशासर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!#MaharashtraDay #JayMaharashtra pic.twitter.com/ZlIeAEPPsd
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 1, 2021
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.#महाराष्ट्रदिन चिरायू होवो. pic.twitter.com/QkGkvUWa31
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 1, 2021
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या आणि जागतिक कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राने ज्या धैर्याने आणि सामर्थ्याने लढला, त्या गुणांचा अंगीकार करुन आज ‘कोरोना’विरुद्धचा लढा एकजुटीने लढू आणि विजयी होऊ! शासन-प्रशासनाला सहकार्य करु. pic.twitter.com/VFTHxmmcB5— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) May 1, 2021
(Maharashtra Day 2021 Politicians wishes)
संबंधित बातम्या :
International Labor Day 2021 : जाणून घ्या 1 मे रोजी ‘कामगार दिवस’ का साजरा केला जातो?