लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सातवा टप्पा पार पडला आहे. या निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आला आहे. देशभरातील जनतेचे डोळे या निकालाकडे लागले आहेत. अशातच सी व्होटरने एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील आकडेवारी जाहीर केली आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपसाठी मोठ धक्का बसलेला दिसत आहे. महाराष्ट्रात मोठा सेटबॅक पाहायला मिळालाय, मविआ यशस्वी होत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं दिसत आहे. सी-व्होटरने दिलेल्या आकडेवारीमध्ये मविआला 24 आणि महयुतीला 23 जागा मिळणार असल्याचं पोलमध्ये म्हटलं आहे. यामध्ये भाजप १७ , एकनाथ शिंदे गट ६, अजित पवार गट १ जागा तर मविआमध्ये ठाकरे गट ९, काँग्रेस ८ आणि शरद पवार गट ६ जागा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकंदरित सी वोटर्सच्या एक्झिट पोलनुसार अवघ्या एका जागेचा फरक दिसत आहे. जर असाच हा निकाल असेल तर भाजपसाठी धक्का मानला जात आहे. मागील निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप यांच्या 41 जागा आल्या होत्या. मात्र महायुती असूनही भाजपसाठी 24 जागा म्हणजे मविआने मोठं यश मिळवलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत असूनही त्यांना या एक्झिट पोलनुसार अधिक जागा येणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत होता. त्यामुळे महायुतीचं यंदा महाराष्ट्रामधील 45 पार करण्याचा दावा फोल ठरताना दिसत आहे. सी वोटर्सच्या पोलनुसार अवघ्या एका जागेने महायुतीकडे आघाडी असल्याचं दिसत आहेत.
दरम्यान, मविआच्या 23 जागांमधील सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सर्वाधिक ९ जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला 9 आणि शरद पवार यांना 6 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र यावरून एक स्पष्ट होत आहे की अजित पवारांचं बंड जनतेला काही रूचलेलं दिसलं नाही.