मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही (Maharashtra Extends Lockdown) कायम ठेवणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी आणखी 16 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी राज्याला संबोधित केलं. (Maharashtra Extends Lockdown) यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही कायम ठेवणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे महाराष्ट्रात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
BREAKING – Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवला, 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम https://t.co/4fCW1dKjPH @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे
– 14 तारखेनंतर लॉकडाऊन कायम, 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला
– 14 एप्रिलनंतर काय होणार कळत नाही आहे, मुंबईत संख्या वाढत आहे, मुंबईत जिथे जिथे रुग्ण आढळले ते विभाग संपूर्ण सील, कुणीही ये-जा करु शकत नाही, त्यांच्यासाठी अन्न, दध, भाजीपाल्याची सोय
– आता कोरोना रुग्ण समोरुन येऊन चाचणी करण्याची वाट पाहणार नाही, तर त्यांच्या घरी जाऊन चाचणी घेत आहोत, महाराष्ट्रात आज सकाळपर्यंत 33 हजार चाचण्या, एकट्या मुंबईत 19 हजार चाचण्या, यापैकी 1 हजार कोरोना पॉझिटिव्ह, 60 ते 70 टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये अती सोम्य लक्षणं
– जे बरे होत आहेत त्यांना घरी सोडण्यात येत आहे, क्वारंटाईन केलेल्यांना टेस्ट करुन घरी सोडत आहोत, तरीही त्यांनी काळजी घ्यावी
– कोरोनाचा धोका 60 पेक्षा अधिक वयाच्या लोकांना, त्यामुळे घराबाहेर पडू नका, पडत असाल तर मास्क लावून पडा, शक्यतोवर बाहेर पडू नका, घरातल्या वृद्ध माणसांपासून दूर राहा
– कोरोना विषाणूच्या गुणाकाराचा वेग मंदावण्यात यश, मला तो शून्यावर आणायचा आहे, कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न
– महाराष्ट्र नेहमीच देशाला आणि जगाला दिशा दाखवत आला आहे (Maharashtra Extends Lockdown). या कोरोनाच्या स्थितीत देखील आपण देशाला आणि जगाला दिशा दाखवणार
– एकत्र येऊन कोरोनाशी लढा, पंतप्रधान मोदी आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत, यात राजकारण नको
– या काळात काही प्रमाणात निर्बंध करण्याबाबत सूचना दिल्या जातील, हा विचित्र व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही शिस्त पाळा
– तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, हे युद्ध जिंकणारच, कारण हरलेल्या मानसिकतेने युद्ध जिंकता येत नाही
Maharashtra Extends Lockdown
मोदी-मुख्यमंत्री बैठकीत काय झाले?
1 बहुतांश राज्यांची लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली.
2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात आली.
3 राज्यांच्या नव्हे देशाच्या पातळीवरच लॉकडाऊन राहावे असा सूर सर्व मुख्यमंत्र्यांचा होता.
4 मुख्यमंत्र्यांनी मला कधीही सल्ले द्यावे, 24 तास उपलब्ध, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
5 केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणे, मदत राज्यांना द्यावी अशीही मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली.
6 केंद्राने आर्थिक मदतही द्यावी अशी राज्यांनी मागणी केली.
7 लॉकडाऊन वाढवा,मेडिकल किट्स द्या असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले.
8 व्यावहारिक निर्णय घ्या, असा सल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला.
9 आपण एकजुटीने, खांद्याला खांदा देऊन लढू, असे मोदी यावेळी म्हणाले.
10 थोडीशी शिथीलता आणून लॉकडाऊन वाढू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे.