मुंबई:महाराष्ट्र सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अकरावी प्रवेशसाठी 21 ऑगस्ट 2021 रोजी होणारी सीईटी ( FYJC CET Cancelled ) परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं सीईटी संदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला आहे. राज्य सरकारला संदर्भात हायकोर्टाने अकरावी मध्ये प्रवेश दहावी मध्ये मिळालेल्या गुणांनुसारच करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार तर्फे निकालाला स्थगिति देण्याची केलेली मागणी ही हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
एवढंच नव्हे तर हायकोर्टाने राज्य सरकारनं 48 तासात या निकालाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असा निर्देश दिला आहे. पुढील सहा आठवड्यांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. यापूर्वी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी सीईटी बाबत सरकारची बाजू मांडली होती आणि सीईटी प्रवेश परीक्षा घेण्याबाबतची माहिती न्यायालयात दिली होती.
खरतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशाबाबत 28 मे 2021 रोजी एक अध्यादेश जारी केला होता. मात्र, सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने करत मुंबई उच्च न्यायालयात तिचे वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेवर आज न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 28 मे 2021 रोजी जारी अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. 11 प्रवेश साठी सीईटी परीक्षा होणार नसून येणाऱ्या 6 आठवड्यात 11 प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्देश राज्य सरकारला हायकोर्टाने दिला आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठीची साईटी परीक्षेसंदर्भात आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे. अकरावी अॅडमिशन प्रोसेससाठी पुढे काय करता येईल यासाठी आम्ही अभ्यास करतो आहे. उच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे ते पाहून पुढील निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना सांगितलं आहे. सीईटी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात निर्णय झाल्याचं ऐकलं आहे. हायकोर्टाचा निकाल मिळाल्यावर त्यामध्ये काय लिहिलय ते पाहावं लागेल. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात आलेला निकाल मान्य करण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात आला नव्हता.गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाला होता. यंदा आम्ही प्रवेश लवकर व्हावेत यासाठी निर्णय घेणार आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
इतर बातम्या:
Class XI Exam : अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द
Maharashtra FYJC CET exam cancelled by Bombay High Court and ordered to Thackeray Government complete class xi admission within six weeks