Asha Bhosle Maharashtra Bhushan | ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

| Updated on: Mar 25, 2021 | 7:51 PM

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. (maharashtra bhushan asha bhosle)

Asha Bhosle Maharashtra Bhushan | ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
ASHA BHOSLE
Follow us on

मुंबई : ख्यातनाम गायिका आशा भोसले (singer Asha Bhosle) यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan award) देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित होते. आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले. ( Maharashtra government declared Maharashtra Bhushan award to singer Asha Bhosle)

अजूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य

आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशकं मराठी तसेच देशवासियांच्या मनावर राज्य केले. अजूनही त्यांची गीतं तेवढ्याच तन्मयतेने आणि अभिरूचीने ऐकली जातात. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशी काही गीतं रसिकांना प्रचंड आवडली. घरातच गायकी असल्यामुळे गाणं शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली.

आशा भोसले अनेक पुरस्कारांनी सम्नानित

आशा भोसले यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गाण्याला पोसलं. मराठी तसेच हिंदी गीतांना त्यांच्या आवाजामुळेच एक नवी उंची मिळाली. त्यांच्या संपूर्ण हयातीत त्यांनी अनेक सदाबहार गीतं चित्रपटसृष्टी आणि रसिकांना दिली. त्यांनी गायलेलं ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’ हे गीत आजही अनेकांना जवळचं वाटतं.

चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भारत सरकारच्या मानाच्या अशा पद्म विभूषण पुरस्कारानेसुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारनेसुद्धा त्यांचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण माहाराष्ट्रातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. संगीत तसेच गायण क्षेत्रातील अनेक मान्यवारांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आशा भोसले यांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | ऋषी कपूर यांच्या आठवणीने आजही नीतू यांना कोसळत रडू, शेअर केला भावूक व्हिडीओ

Defamation Case | कंगना रनौतला मिळाला जामीन, आता काय असणार जावेद अख्तर यांचे पुढचे पाऊल?

Phulala Sugandh Maticha | ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम जिजी अक्का आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून

( Maharashtra government declared Maharashtra Bhushan award to singer Asha Bhosle)