मुंबई : अवघ्या दोन दिवसात म्हणजेच येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण केले जाणार आहे. केंद्राकडून भारत आणि सीरमच्या या दोन कंपनींच्या कोरोना लसींना परवानगी देण्यात आली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Maharashtra Government Give Details About Corona Vaccination)
नुकतंच राज्य सरकारकडून कोरोना लसीकरण कसं होणार, जनतेला कोरोनाची लस कशी दिली जाणार, कोरोना लसीचा दुसरा डोस कसा मिळणार यांसह इतर अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे.
● येत्या 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे.
● यासाठी सिरम इन्स्टीटयूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.
● राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लसीचे 20,000 डोसेस प्राप्त झाले आहेत. ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
● भारत बायोटेक कडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे.
त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये व 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.
● केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय आणि खाजगी डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. (Maharashtra Government Give Details About Corona Vaccination)
● या लसीचे 2 डोस 4 आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री, AD Syringes तसेच AEFI Kit उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ही देण्यात आले आहे.
● केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा सुरु झाला असून सध्या पुरवठा करण्यात आलेल्या डोसेस नुसार 285 ठिकाणी व्हॅक्सिनेशन सेशन्स आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्येक लाभार्थीला लसीचे 2 डोस 4 ते 6 आठवडयाच्या अंतराने देण्यात येणार आहे.
● टप्प्याटप्याने केंद्र शासनाकडून नोंदणी केलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली लस पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी या लसीच्या 2 डोसने संरक्षित होणार आहेत. व यासाठी लसीचा साठा केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे.
● नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसेच खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Maharashtra Government Give Details About Corona Vaccination)
वीज खांबांपासून 30 मीटरच्या आतील कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी मिळणार : डॉ. नितीन राऊत#DrNitinRaut #AgriculturalPumps https://t.co/3Eht9PU5bk
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2021
संबंधित बातम्या :
Covid vaccine ! कलियुगातील संजीवनी मुंबईत आली; कोरोना लसीच्या वितरणासाठी BMC सज्ज: महापौर
कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?