ओबीसींच्या सवलतीमुळे अडचणी, मागास आयोग रद्द करा; विनायक मेटे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

| Updated on: Sep 07, 2021 | 10:20 AM

मराठा आरक्षणाप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यात बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीआधीच मेटे यांनी मोठी मागणी केली आहे. (maharashtra government should cancel obc commission, vinayak mete's demand)

ओबीसींच्या सवलतीमुळे अडचणी, मागास आयोग रद्द करा; विनायक मेटे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
विनायक मेटे
Follow us on

मुंबई: मराठा आरक्षणाप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यात बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीआधीच मेटे यांनी मोठी मागणी केली आहे. ओबीसींच्या सोयी सवलतीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ओबीसींसाठी नेमलेला मागास आयोग रद्द करण्यात यावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. (maharashtra government should cancel obc commission, vinayak mete’s demand)

विनायक मेटे यांनी मीडियाशी सवंवास साधताना हा इशारा दिला. केद्राने राज्याला अधिकार दिल्यानंतरही राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही हे आज मी सिद्ध करेन. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींचा जो मागास आयोग नेमलाय, तो रद्द व्हायला पाहीजे, ओबीसींच्या सोयी सवलतींमुळे अडचण निर्माण झाली आहे, असा दावा मेटेंनी केला आहे.

या बैलांना मोकाट सोडलंय का?

छत्रपती स्मारक, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, असे अनेक महत्वाचे विषय आहेत. त्याबाबत आजच्या बैठकीत मुंख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. वडेट्टीवार यांना कुणी तरी सुपारी दिली आहे. त्यामुळे ते वातावरण भंग करत आहेत. समाजात भांडण लावत आहेत. तंटे लावत आहेत. त्यांचे प्रदेशाध्यक्ष अवाक्षर काढत नाहीत, ओबीसी- मराठ्यांत भांडण लावण्याचा कांग्रेसचा अजेंडा आहे का?, असा सवाल त्यांनी केला. त्यासाठीच मंत्र्यांना मोकळं सोडलं का?, कालच बैल पोळा झाला त्यानुळे या बैलांना मोकाट सोडलंय का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आजच्या बैठकीत निर्णय घ्यावा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही आरक्षणाबद्दल दिलासा कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न करत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो. पण आज मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे. बरेच मुद्दे आहेत जे मार्गी लागणं गरजेचं आहे. आरक्षणाचा मुद्दा आहे, नेकरभरतीचा मुद्दा आहे. त्यावर आजच्या बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेतील ही अपेक्षा आहे. नाहीतर ये रे माझ्या मागल्या असं व्हायला नको. फार्स नको व्हायला, असं मेटे म्हणाले.

तर बैठक वांझोटी ठरेल

मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, मंत्र्यांना बोलावलं पाहिजे. ते जर उपस्थित राहिले नाही तर ही बैठक वांझोटी ठरेल, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.

चव्हाणांवर टीका

यापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मेटे यांनी सरकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केला होता. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या, अशी मागणीही केली होती. (maharashtra government should cancel obc commission, vinayak mete’s demand)

 

संबंधित बातम्या:

Maratha Morcha : कितीही हजारांचा पोलीस बंदोबस्त असू दे, मराठा मोर्चा निघणारच; विनायक मेटेंचा निर्धार

बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची परवानगी नाही; मोर्चा निघणारच, विनायक मेटे ठाम

Maharashtra Rain Updates : राज्यात ठिकठिकाणी पाऊस, कुठं मुसळधार, तर कुठं सर्वदूर रिमझिम

(maharashtra government should cancel obc commission, vinayak mete’s demand)