लोकल प्रवासावर निर्बंध आणणार?, गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली; कोणत्याही क्षणी घोषणेची शक्यता

| Updated on: Jan 06, 2022 | 11:39 AM

मुंबईत कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबईतील लोकलच्या गर्दीवर चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लोकल प्रवासावर निर्बंध आणणार?, गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली; कोणत्याही क्षणी घोषणेची शक्यता
फाईल चित्रं
Follow us on

मुंबई: मुंबईत कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबईतील लोकलच्या गर्दीवर चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, हे निर्बंध कसे असतील या बाबतची अधिकृत माहिती देण्यात आली नसून लोकलबाबतच्या निर्बंधांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

काल मुंबई मध्ये एकूण 15 हजार 166 रुग्ण आढळून आल्याने लोकल प्रवासावर राज्य सरकार निर्बंध लावणार का याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष आहे. अनेक प्रवासी हे कामानिमित्त मुंबईकडे जात असतात. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जाते. याच आधारावर मुंबईत रेल्वेने प्रवास करण्यासाठी निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गर्दी हेच एकमेव कारण

सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांना सर्दीपडसे, खोकला आणि ताप येत आहे. त्यातच लोक बाजार पेठेत गर्दी करताना दिसत आहेत. विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. लोकलमधूनही मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असून अनेकजण तर मास्कशिवायच वावरताना दिसत आहेत. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. त्यातच सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांमुळे इतरांनाही संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. त्यामुळेच लोकलवरही काही निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे.

दोन डोस घेणाऱ्यांनाही प्रवासास बंदी?

दरम्यान, सध्या रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यापैकी दोन डोस घेतलेल्यांना तूर्तास प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईतील आकडा वाढतोय

मुंबईत काल 15 हजार 166 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 13 हजार 195 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर  1 हजार 218 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. काल दिवसभरात 714 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. 29 डिसेंबर 2021 ते 4 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.78 टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 89 दिवसांवर आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन 20 आहेत. तर मुंबईतील 462 इमारती सीलबंद आहेत, अशी माहिती महापालिकेनं दिली आहे.

 

संबंधित बातम्या:

दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान तयार

भीतीची लाटही नको, का? राज्यातली ही तुलनात्मक आकडेवारी नेमकं काय सांगते?

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुणे महापालिका वाढत्या रुग्णसंख्येमुळं अलर्ट मोडवर