अमेरिकेतील मुख्य इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Tesla भारतात एंट्री करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हापासून कंपनी भारतात तंबू टाकण्याच्या विचारात आहे. कंपनी महाराष्ट्र, तामिळनाडून आणि गुजरातपैकी एका राज्यात तिची फॅक्टरी उभारण्याची तयारी करत आहे. भारतातून दक्षिण आशियात मुसंडी मारण्याची कंपनीची तयारी आहे. टेस्ला भारतातील प्रकल्पासाठी जवळपास 16,700- 25,000 कोटी रुपयांदरम्यान गुंतवणूक करणार आहे.
काय आहे योजना
टाईम्स ऑफ इंडियाच्या मागील एका वृत्तनुसार, टेस्ला भारतात जवळपास 5 लाख इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करण्याची योजना आखत आहे. टेस्लाची इलेक्ट्रिक कार 20 लाख रुपयांपासून भारतात विक्री होईल. जर ही योजना पूर्ण झाली तर भारतीय इलेक्ट्रिक बाजारात तीव्र स्पर्धा असेल. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा आणि फीचर्ससह कार उपलब्ध होतील. इतर कंपन्यांनी पण यामध्ये मोठी भरारी घेतली आहे. भारतीय टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार उत्पादनात मोठी भरारी घेतली आहे. इतर बाहेरील ब्रँड पण भारतात येण्याच्या तयारीत आहेत.