मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. राज्यात लॉकडाऊन लावला जावा का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्वाची मानली जातेय. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख सहभागी झाले. (congress leaders opinion on complete lockdown in maharashtra)
राज्यातील आजच्या स्थितीत लोकांचा जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा लागेल. मृत्यू थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करा. वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी तो स्वीकारायला हवा, असंही पटोले यांनी म्हटलंय. राज्यात कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तरत कोरोनाची साखळी तुटेल. गुजरातमधून रेमडेसिव्हीरचा साठा मिळू शकला तर पाहावा. देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित आहेत. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
तर राज्यात आव्हानात्मक परिस्थिती आहे. लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायचे असतील तर गरीबांचं नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊन नको आणि सर्व सुरुही नको, मध्यबिंदू काढा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच उद्योगांबाबत बोलताना लोकांचं येणं जाणं कमी केलं पाहिजे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचं नियोजन करा, पीक आवर ही संकल्पना आता बदलायला हवी, असं मतही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्या हातावर शस्त्रक्रिया होत आहे., त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यामुळेच आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.
Video | CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra @OfficeofUT #Maharashtra #WeekendLockdown #MaharashtraLockdown pic.twitter.com/IbtCFTjMyz
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 10, 2021
संबंधित बातम्या :
congress leaders opinion on complete lockdown in maharashtra