Maharashtra Lockdown : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मिनी लॉकडाऊन’, काय बंद, काय सुरु राहणार?

| Updated on: Apr 04, 2021 | 5:51 PM

राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू असतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय.

Maharashtra Lockdown : संपूर्ण महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन, काय बंद, काय सुरु राहणार?
lockdown
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती विदारक बनत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत, तशी माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय. राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू असतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय. (Mini lockdown announced in Maharashtra, what started in the state, what will be closed?)

राज्यात काय सुरु, काय बंद?

> उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार
>> मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार
>> सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाणार
>> राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
>> सर्व बांधकामे सुरु राहतील
>> सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार
>> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील
>> शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. मात्र राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार
>> सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक
>> 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

शनिवार, रविवार कडकडीत बंद

राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार आणि रविवार कठोर निर्बंध असणार आहेत, तशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

lockdown in maharashtra: राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Maharashtra Lockdown : 20 बेड्स असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरणाला परवानगी, कामगारांसाठीही महत्वाचा निर्णय

Mini lockdown announced in Maharashtra, what started in the state, what will be closed?