मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी आदेश लागू होतील. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केलीय. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसंच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना आपल्या कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. (All guidelines of curfew in Maharashtra What starts and what stays off)
आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनची नियमावली जाणून घेणं गरजेचं आहे. या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाने केलं आहे. एखाद्याने जाणूनबुजून या नियमांचं उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
1. राज्यात कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी लागू होणार
2. कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही
3. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील
4. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार यातून वगळण्यात आले आहेत.
5. अपवादश्रेणीत असलेली सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत.
6. मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.
7. उपहारगृह, बार, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, फक्त होम डिलिव्हरी किंवा टेक-अवेसाठी परवानगी
8. मनोरंजन, दुकाने, मॉल ,शॉपिंग सेंटर इत्यादी सर्व सिनेमा हॉल बंद राहतील.
9. नाट्यग्रह तसेच थेटर पूर्णपणे बंद राहतील.
10. उद्याने, व्हिडीओ गेम, पार्लर बंद राहतील.
11. वॉटर पार्क, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले बंद राहतील.
12. चित्रपट /चित्रवाणी /मालिका /जाहिरातींसाठीच्या शूटिंग बंद असतील.
13. आवश्यक सेवा न देणारी सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर बंद राहतील.
14. समुद्रकिनारे, उद्यान, खुली जागा सारखे सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील.
15. धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील
16.नाभिक दुकाने / सौंदर्य प्रसाधन केंद्रे / केश कार्तानालये बंद राहतील
17. शाळा, कॉलेज आणि खासगी शिकवणी बंद राहतील
18. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही
19. विवाह समारंभासाठी 25 लोकांना परवानगी
20. अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
1. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाने कार्यरत राहताना कोविडसुसंगत वागणूक ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनीही दुकानाच्या परिसरात तसे वागायला हवे.
2. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यंनी लवकरात लवकर लशीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकाशी पारदर्शक काचेच्या मधून किंवा इतर संरक्षक पदार्थांच्या द्वारे संपर्क करणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे वळते करणे अशी सुरक्षाविषयक काळजी घ्यायला हवी.
3. या नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडसंसुसंगत वागणूकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडविषयक संकटाची अधिसूचना संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कारवाईही केली जाऊ शकेल.
4. जीवनावश्यक वस्तू दुकानातले व्यवहार करण्यासाठी कर्तव्यपूर्तीसाठी कामगारांची वाहतूक हे वैध कारण धरले जाईल.
5. वाण्याचे दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दूधदुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने या सर्वांच्या संदर्भात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी दुकाने आहेत का? किंवा दुकानांमध्ये गर्दी होते आहे का? याबद्दल स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करून देणे आवश्यक आहे.
6. खुल्या मैदानांच्या जागा मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकाने हलवणे शक्य आहे का, तात्पुरत्या स्वरूपाची दुकानं सुरू करता येतील का, हे बघणेही आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारचे उपाय योजणे गरजेचे आहे ज्याद्वारे हे जीवनावश्यक व्यवहार कोविड पसरण्याला निमंत्रण देणारे ठरणार नाहीत. स्थानिक प्रशासन काही व्यवहार बंदही करू शकेल.
7. सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लशीकरण करून घ्यावे. तसेच ग्राहकांशी संपर्क काचेच्या संरक्षक कवचाच्या माध्यमातून यावा, ही पूर्वकाळजी घेण्याची सुविधा निर्माण करावी आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचाही अवलंब करावा ज्याद्वारे त्यांची दुकाने कोणत्याही प्रकारे कोविड संसर्ग न पसरवता कार्यान्वित केली जाऊ शकतील.
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown | पार्सल किंवा होम डिलिव्हरीला प्राधान्य, हॉटेल रेस्टॉरंटसाठी नवे नियम काय?
बसमध्ये उभ्या प्रवाशांना बंदी, रिक्षा-टॅक्सीसह इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी नियम काय?
Maharashtra Lockdown: तुमची नोकरी-व्यवसाय जीवनावश्यक सेवांच्या यादीत येते का, पाहा ही संपूर्ण यादी
All guidelines of curfew in Maharashtra What starts and what stays off