मुंबई : कालपासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात अंधेरीमधील सबवे पाण्याखाली गेला. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईकरांना आश्वस्त केलं आहे. महापालिका, प्रशासन सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं. शिवाय पालिका यंत्रणा कशी काम करते, यावरही त्यांनी भाष्य केलंय.
मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबईतील पावसाच्या बीएमसी मुख्यालयाच्या वॉर रूममधून आढावा घेतला. महानगरपालिकेने चोख बंदोबस्त केली आहे. या ठिकाणी साडेनऊशे कॉल आलेले आहे आणि त्याचा आढावा पण चालू आहे, असं लोढा म्हणाले आहेत.
घाटकोपरमध्ये स्लॅप कोसळला त्यानंतर तिथे डिजास्टर टीम पोहोचली आहे आणि त्या ठिकाणी मदत केली जात आहे. सखल भागात त्या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहे. राजकारणात मी काही बोलू इश्चित नाही पण त्या ठिकाणी पाणी साचल्यावर काढण्यात आलं. 1916 हा नंबर आहे हेल्प डेस्कचा आणि त्या ठिकाणी ही मदत पोहचवली जाईल, असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर चांगल्या प्रकारे नाले सफाई आणि झाडांच्या फांद्या ह्या तोडल्या गेल्या आहेत. स्वच्छतेची कामं केली जात आहेत. नाले सफाई झालेली आहे त्यासाठी सुधारणा केली आहे, असं लोढा म्हणालेत.
मोठे पाण्याचे रिझर्व टॅंक बनवलेले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. अंधेरी-सायन बागात वॉटर टॅंकरचं काम करण्यात आलं आहे. विशिष्ट टीमची अजून गरज नाही पण त्या ठिकाणी काही गरज लागल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्ष अशा टीम बनवणार आहे, असंही लोढा यांनी सांगितलं आहे.
लोकांना हेच आवाहन आहे की जास्त पाऊस असल्यावर घरा बाहेर पडू नका. स्वत:ची तसंच आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. गरज पडल्यासच बाहेर जा. पण काही अडचण आल्यास कंट्रोल रूमला फोन करा, असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत.
सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावरही लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे फिल्ड आहे ते चांगलं आहे. अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी ते जात आहेत, असंही ते म्हणालेत.