मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमामध्ये गजानन काळे यांनी बोलताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली. त्यांनी यावेळी बोलताना महिला नेत्यांवरही पातळी सोडून टीका केली. सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांना काळी मांजर म्हणत त्यांच्यावरही पातळी सोडून टीका केली तर दीपाली सय्यद यांच्यावर टीका करताना दीपाली सय्यद म्हणजे सय्यद बंडा म्हणत त्यांनाही हिणवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गजानन काळे आणि ठाकरे गट असं युद्ध रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
गजानन काळे यांनी सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांच्यावरही पातळी सोडून टीका करताना संजय राऊत यांच्यावर त्याच प्रकारची टीका त्यांच्याकडून करण्यात आली.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी बारामतीची चाटूगिरी करून राजकीय प्रवास केला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीच्या आधी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रचंड टीका करत होते, तर दिल्ली जाऊन मात्र शरद पवार यांच्याच बंगल्यावर जाऊन भेटत होते अशी टीका संजय राऊत यांच्यावर गजानन काळे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे आणि दीपाली सय्यद यांच्यावर टीका करताना गजानन काळे यांनी टीका करताना मात्र त्यांनी पातळी सोडून टीका केली. त्यामुळे गजानन काळे यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे.
सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादीचे पार्सल म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे दीपाली सय्यद यांना सय्यद बंडा म्हणूनही हिणवण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात अंधारे-काळे वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.