KMC Election 2022: मनसेचं ठरलं कोल्हापूर महानगरपालिका पूर्ण ताकदीनं लढणार; मनपा निवडणुकीची पाच जणांवर जबाबदारी; राजकीय हालचालींना येणार वेग

| Updated on: Jul 11, 2022 | 6:52 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोल्हापूर महानगरपालिकेबाबत आताच जाहीर करण्यात आले आहे की, कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मनसेकडून पूर्ण ताकदीने लढविली जाणार आहे.

KMC Election 2022: मनसेचं ठरलं कोल्हापूर महानगरपालिका पूर्ण ताकदीनं लढणार; मनपा निवडणुकीची पाच जणांवर जबाबदारी; राजकीय हालचालींना येणार वेग
Follow us on

मुंबईः सध्या राज्यातील राजकीय वातावरण सगळं ढवळून निघालं असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) आता महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे (Municipal elections) लक्ष घातले आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुका काही दिवसातच होतील त्या धर्तीवर आता मनसे पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Corporation) ताकदीनं लढविणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांबाबत आता पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात येत असून आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसे कामाला लागली आहे. त्यासाठी प्रत्येक महानगरपालिकांसाठी म्हणजेच एका महानगरपालकेसाठी पाच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोल्हापूर महानगरपालिकेबाबत आताच जाहीर करण्यात आले आहे की, कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मनसेकडून पूर्ण ताकदीने लढविली जाणार आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीपासून वेग

त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात आता आणखी रंगत वाढणार आहे. कोल्हापूरात राज्यसभा निवडणुकीपासून कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे, त्यामुळे नंतर झालेली विधावसभा निवडीवेळीही कोल्हापूरातील राजकारणात मोठी रंगत आली होती.

मनसेकडू जाहीर

आता मनसेकडून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी जाहीर करण्यात आल्याने आता कोल्हापूर महानगरपालिका राजकारणात आता वेगवेगळ्या हालचाल्या दिसून येणार आहे. मनसेच्या भूमिकेनंतर कोल्हापूरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे नेते याबाबत आता काय भूमिका घेणार किंवा या निवडणुकीविषयी कशी आखणी करणार ते आता येणाऱ्या काळातच ठरणार आहे.

मनसेचे पाच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कधी होईल तेव्हा होईल पण मनसेकडून मात्र आताच फिल्डिंग लावण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकींची काम करणाऱ्यासाठी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्य बाळ नांदगावक, अभिजित पानसे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, अनिल शिदोरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.