पोलीस भरतीचे वेळापत्रक बदलले! पोलीस आयुक्तांचा निर्णय, नवीन तारीख काय?

| Updated on: Jun 19, 2024 | 6:15 PM

Maharashtra Police Recruitment 2024 : राज्यभरात आज पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

पोलीस भरतीचे वेळापत्रक बदलले! पोलीस आयुक्तांचा निर्णय, नवीन तारीख काय?
महाराष्ट्र पोलीस
Follow us on

राज्याभरात आज पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यभरात  17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज तरूण-तरूणींकडून करण्यात आलेत. पावसाळ्याच्या तोंडावर भरती प्रक्रियेला सुरूवात करण्यात आलीये. अशातच एक मोठी अपडेट समोर आली असून पोलीस भरतीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. पाऊस पडलेल्या ठिकाणी उमेदवारांना नवीन तारीख देण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्ग निहाय भरती प्रक्रिया आज पासून सुरु होणार होती मात्र काल पासून पडत असलेल्या पावसामुळे मैदान चाचणी घेण्यायोग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेय. आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी 23 जून रोजी होणार आहे. तर 21 जून आणि 22 जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार आहे. पोलीस मुख्यालय उपायुक्त संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

पोलीस भरतीच्या या वेळापत्रकामधील हा बदल नवी मुंबई मध्ये होणाऱ्या भरतीबाबत घेण्यात आला आहे. कारण उमेदवारांना भरती देताना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला  आहे. इतर ठिकाणी नियोजनाप्रमाणे भरती प्रक्रिया सुरू आहे.

17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 करण्यात आले आहेत.  अर्ज करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरूणाईची संख्या अधिक आहे. डॉक्टर, वकील, एमबीए आणि बी.टेक केलेले उमेदवार पोलीस भरतीच्या प्रक्रियेत उतरले आहेत. तर राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे.