मुंबई : राज्यात कोरोनाबाधिताचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावले जात आहे. कोरोनापासून सरंक्षण करण्यासाठी शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन करा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्वीट केलं आहे. (Maharashtra Police Tweet Anna naik Ratris Khel Chale character photo For the appeal of the mask)
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मास्कचा वापर, हात धुणे आणि अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करा असे आवाहन करण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेकांकडून ही त्रिसूत्री पाळली जात नाही. बाहेर फिरताना अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.
कोरोनाचा ‘खेळ’ संपवूया! महाराष्ट्र पोलिसांचे ट्वीट
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्वीट करत जनतेला कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले आहे. “मास्क लावणे, अंतर राखणे, हात स्वच्छ करणे, ‘तीन’ गोष्टी लक्षात ठेवूया, कोरोनाचा ‘खेळ’ संपवूया!” असे ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे.
विशेष म्हणजे हे ट्वीट करताना महाराष्ट्र पोलिसांनी झी मराठीवर नव्याने सुरु होणाऱ्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचा आधार घेतला आहे. या मालिकेत अण्णा नाईक हे पात्र आहे. या पात्राला पोलिसांनी मास्क लावला आहे. त्याखाली मास्क वापरतास ना? असा प्रश्न पोलिसांनी विचारला आहे. सध्या या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मास्क लावणे, अंतर राखणे, हात स्वच्छ करणे –
‘तीन’ गोष्टी लक्षात ठेवूया
कोरोनाचा ‘खेळ’ संपवूया!#CoronaChaKhelSampnar #StaySafe pic.twitter.com/q4qNOU5Ddg— Maharashtra Police (@DGPMaharashtra) March 22, 2021
राज्यातील कोरोना स्थिती काय?
राज्यात काल दिवसभरात तब्बल 30,535 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार दिवसात फक्त महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आजही हे आकडे गांभीर्याने घेतले नाहीत. तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याती शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आतातरी वेळीच सावध होण्याची जास्त आवश्यकता आहे.
मुंबईत किती रुग्ण सक्रीय?
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. मुंबईत दिवसभरात 3775 रुग्ण आढळले आहेत. तर 1647 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत सथध्या 23 हजार 448 रुग्णांवर उपचार सुरु आहे. (Maharashtra Police Tweet Anna naik Ratris Khel Chale character photo For the appeal of the mask)
संबंधित बातम्या :
बापरे ! दिवसभरात 30,535 रुग्ण, महाराष्ट्रात कोरोनाचा थयथयाट
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक, रुग्णांच्या संख्येनुसार झोनची विभागणी