Ajit Pawar Speech : ठाण्याचा पठ्ठ्या म्हणत अजित पवार यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले…

| Updated on: Jul 05, 2023 | 4:04 PM

शरद पवारांनी अशी काही लोकं बरोबर घेतली आहेत जी संघटनेचं वाटोळं करत आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला. त्यासोबतच त्यांच्यामुळे काही नेत्यांनी पक्ष सोडल्याचा आरोप करत त्या नेत्यांची नावं सांगितली आहेत.

Ajit Pawar Speech : ठाण्याचा पठ्ठ्या म्हणत अजित पवार यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मेळाव्यामध्ये अनेक गौप्यस्फोट आणि खुलासे केले आहेत. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आणि शरद पवार यांच्या राजकीय प्रवासावर बोलताना त्यांनी बदलेल्या भूमिकांबाबत जाहीरपणे सांगितलं. 2019 वेळी सत्तास्थापने वेळी कशा प्रकारे राजकीय वर्तुळात हालचाली झाल्या याबाबतही अजित पवारांनी खुलासा केला. त्यासोबतच ठाण्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

शरद पवारांनी अशी काही लोकं बरोबर घेतली आहेत जी संघटनेचं वाटोळं करत आहेत. उदाहरण द्यायचं तर तो ठाण्याचा पठ्या. त्यांच्यामुळं ठाण्याचे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन ठावखरे, वसंतराव डावखरे, किसण कतोरे आदी नेते पक्षाला सोडून गेले. अनेक नेते मला म्हणतात साहेब याला का मोठं करतात. आपल्यामध्ये जीवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजेत, त्यांनी स्वतः नेतृत्व केलंच पाहिजे. त्यासोबत बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. प्रत्येक मंत्र्यानी 4-4 आमदार निवडून आणले पाहिजेत, पण ते तर आपलेच आमदार घालवता साहेबांनीही त्यांनाच मोठं केलं, असं म्हणत पवारांंनी थेट आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं.

मला वारंवार व्हीलन केलं जातं. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक आहे का? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. शरद पवारांच्या धोरणामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. माझी वरिष्ठांना विनंती आहे त्यांनी आता आराम करावा, जास्त हट्टीपणा करू नये. असा टोला अजित पवारांनी लगावला. कार्यकर्तांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्ताला आणि नेत्याला मी मंत्रिमंडळात असेपर्यंत कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.