मुंबई | महाराष्ट्रात रविवारी 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार राज्य सरकारच्या गळाला लागले. अजित पवार यांच्यासह राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी दादांना उपमुख्यमंत्रिपदाची आणि इतर 8 आमदारांना मंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
राज्य सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्ताराला राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे आणि मोठे नेते उपस्थित होते. यावेळेस मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे अमोल कोल्हे शरद पवार यांच्यासोबत आहेत की अजित पवार? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता. मात्र अखेर शपथविधीच्या 1 दिवसानंतर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अमोल कोल्हे कुणासोबत?
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओद्वारे त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत साकारलेल्या ऐतिहासिक भू्मिका गाजल्या आहेत. यात संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची साकारलेली भूमिका प्रत्येकाच्या लक्षात राहणारी आहे. आता कोल्हेंनी शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील एक व्हीडिओ पोस्ट केलाय. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है. पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत”, असं कोल्हेंनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि पहिल्या फळीतील नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली. दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, बाबुराव अत्राम, अनिल पाटील आणि संजय बनसोडे या 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, यातील 8 पैकी काही माजी मंत्र्यांना मविआ काळातील खात्यांचीच जबाबदारी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता कुणाला कोणतं खातं मिळतं हे खातेवाटप जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.