लोकसभा निवडणुक पार पडल्यावर राज्यात सर्व पक्ष आता तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आताच जागावाटपावरून जागांची मागणी केली जात आहे. अशातच येत्या विधानसभा निवडणुकीचा पोल टीव्ही9 मराठीने दाखवलाय. हा पोल लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आधारित आहे. या पोलनुसार महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीला 288 पैकी महाविकास आघाडीला 158 जागा तर महायुतील 127 जागा मिळाल्याचं दाखवत आहे. तर या आकडेवारीनुसार काँग्रेसचा मुख्यमंत्री होत आहे याचं कारण म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जास्तीच्या जागा मिळत आहेत.
महाविकास आघाडीचं सरकार येत असून काँग्रेसच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षाचे आता ४५ आमदार आहेत तर लोकसभेमध्ये मिळालेल्या लीडनुसार २७ जागांची वाढ होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या एकूण ७२ जागा होत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आता १२ आमदार असून त्यांना लोकसभेच्या पोलनुसार ४० जागांची वाढ होत आहे. राष्ट्रवादीच्या एकूण ५२ जागा होत आहेत. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सध्या १५ आमदार आहेत तर १५जागा त्यांच्या वाढत असून त्यांना एकूण ३० जागा मिळताना दिसत आहेत.
या आकडेवारीनुसार सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत. संख्याबळाचा विचार केला तर काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकते. कारण काँग्रेसकडे सर्वाधिक ७२ जागा होत आहे. शरद पवार गटाच्याही जागांमध्ये वाढ होत असल्याने त्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाच्या १५ जागा वाढल्याचा अंदाज या पोलमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता जागावाटप कसं होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.
लोकसभेच्या पोलनुसार आकडेवारी पाहिली तर दिग्गजांच्या मतदारसंघात भाजप पिछाडीवर गेली आहे. यामध्ये शिंदे गटचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संतोष बांगर, छगन भुजबळ, नबाव मलिक, दत्तात्रय भरणे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.