मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole) यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) मंत्र्यांचे जनता दरबार होणार आहे. या जनता दरबाराच्या (Janata Darbar) नियोजनासाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचा जनता दरबार होणार असून शिक्षण खात्याशी संबंधित प्रश्न यावेळी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाशी संबंधित ज्यांच्या काही समस्या असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे करण्यात आले आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष या समन्वय समितीचे निमंत्रित असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार व प्रमोद मोरे यांच्याकडे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एम. एम. शेख, सुभाष कानडे, सरचिटणीस हुस्नबानो खलिफे, रमेश शेट्टी, चंद्रकांत पाटील, चिटणीस सचिन गुंजाळ, संतोष केणे, यशवंत सिंह ठाकूर, राहुल दिवे या समितीचे सदस्य आहेत. तर अॅड. विनय राणे आणि रवींद्र परटोले हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
गुरुवारी (12 मे) सकाळी 11 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचा जनता दरबार होणार असून शालेय शिक्षण विभागाशी संबंधित ज्यांच्या काही समस्या असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे करण्यात आले आहे.