मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली असून रेल्वे स्थानकांवर मोठ्य प्रमाणात अजूनही गर्दी आहे. काही जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. NDRF ची टीम ठिकठिकाणी लोकांना मदत करत आहे. रस्त्यांसह काही गावांमध्ये पाणी शिरल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळांना उद्या म्हणेजच गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पर्यटक आणि नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्टेशनबाहेर बस पाठवण्यात आल्या असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, भायखळा, दादर या स्टेशनवरील झालेली गर्दी कमी करण्यासाठी ज्यादाच्या बस सोडण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचं सर्व ठिकाणी लक्ष असून मुंबईमधील परिस्थिती आता कंट्रोलमध्ये आहे. NDRF च्या सर्व टीम पाठवण्यात आलं असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. रायगडमधीली पाणी आता ओसरत चाललं असून राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला असल्याचंही शिंदेंनी सांगितलं.
दरम्यान, नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही. प्रत्येक ठिकाणी NDRF आणि स्थानिक यंत्रणा स्पॉट ठिकाणी पोहोचल्या असून जबाबदारीनुसार सर्वजण काम करत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.
राज्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर शाळांना आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करण्यात यावी. शाळांच्या पातळीवरच योग्य तो निर्णय घेण्याचे शाळांना अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पत्रक काढून दिल्यात सूचना दिल्या आहेत.