मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होत होती. आज मात्र कोरोना आकडेवारीत राज्याला (Today Corona Numbers) थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यातली आजची रुग्णसंख्याही कालच्या रुग्णसंख्येपेक्षा काहीशी कमी झाल्याचे आजच्या आकडेवारीतून (Maharashtra Corona Update) समोर आले आहे. मात्र ही घटलेली रुग्णसंख्या खूप मोठी नाही. त्यामुळे अद्यापही कोरोनाचे सावट हटताना दिसत नाही. प्रशासनाकडून वेगवान कोरोना चाचण्या (Corona Test) आणि आवश्यक ती खबरदारी घेणे सुरूच आहे. यात सर्वात जास्त रुग्ण हे मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरात आढळून येत असल्याने मुंबईची चिंता पुन्हा वाढली आहे. आज राज्यात 3,883 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कालच राज्यात 4255 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्ण घटले आहेत.
Maharashtra reports 3,883 fresh COVID-19 cases and two deaths today; Active cases at 22,828 pic.twitter.com/Mkzcqp6lFi
— ANI (@ANI) June 18, 2022
देशातला कोरोनाचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबई आणि राजधानी दिल्लीने पुन्हा प्रसानाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे ही दोन्ही मोठी शहरं सध्या अलर्ट मोडवर आहेत. राजधानी दिल्लीत आज 1,534 नव्या कोरोना केसेस आढळून आल्या आहेत.
Delhi reports 1,534 fresh Covid19 infections today; Active cases at 5,119; Positivity rate at 7.71% pic.twitter.com/uSFJbD13Rw
— ANI (@ANI) June 18, 2022
मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच संसर्ग पुन्हा वाढल्याने साहजिकच त्याचा परिणाम हा देशातील कोरोना रुग्णवाढीवर होत आहे. दहा हजारांच्या खाली असणारा कोरोना आकडा पुन्हा तेरा हजारांच्या पार झाला आहे. देशात आज 13,216 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता देशाचे आरोग्य मंत्रालयही वेळोवेळी राज्यांना आवश्यक त्या सूचना करत आहेत.
#COVID19 | India reports 13,216 new cases, 8,148 recoveries and 23 deaths in the last 24 hours.
Active cases 68,108
Daily positivity rate (2.73%) pic.twitter.com/2RM2vtVa4e— ANI (@ANI) June 18, 2022
#CoronavirusUpdates
18th June, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 2054
Discharged Pts. (24 hrs) – 1743Total Recovered Pts. – 10,59,612
Overall Recovery Rate – 97%
Total Active Pts. – 13613
Doubling Rate – 389 Days
Growth Rate (11th June- 17th June)- 0.174%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 18, 2022