SSC HSC Exams : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करण्याची शक्यता, महत्त्वाच्या बैठकीत निर्णय काय?

| Updated on: Apr 07, 2021 | 4:36 PM

Maharashtra SSC, HSC Board Exam 2021: नववी आणि अकरावीचा निर्णय उद्या होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर देण्यात आली.

SSC HSC Exams : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करण्याची शक्यता, महत्त्वाच्या बैठकीत निर्णय काय?
Varsha Gaikwad
Follow us on

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय घेण्यात आहे. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबात कोणताही निर्णय झालेला नाही. त्या संदर्भातील परीक्षांबाबत चर्चा बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील पास केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra SSC HSC Exam Varsha Gaikwad high level meeting held nine and eleven standard exams decision will declare tomorrow ssc hsc offline exams decision pending)

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करणार?

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती.या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित होते.  राज्यात शनिवारी आणि रविवारी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या शनिवारच्या पेपरच काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला होता.

नववी आणि अकरावी परिक्षेबाबात ऊद्या संध्याकाळी निर्णय होणार आहे. तर, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय पाच दिवसांनंतर होणार आहे. पहिली ते आठवी प्रमाणं या मुलांनाही पास केलं जाईल, अशी खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील प्रमोट करावं अशी मागणी केली होती.

दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार?

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसाच निर्णय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होण्याची शक्यता आहे.  मात्र, तसा निर्णय झाला नाहीतर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

पहिली ते आठवी सरसकट पास

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोव्हिडची परिस्थित लक्षात घेता महाराष्ट्रातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केले जाणार आहे. तर नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल

संबंधित बातम्या:

Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?

SSC HSC Exams : राज्यात कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक