मुंबई : राज्यात आज दिवसभरात (Maharashtra Total Corona Cases) तब्बल 178 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसातील मृत्यूचा हा सर्वोच्च आकडा आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 हजार 128 वर पोहोचला आहे. या 178 पैकी 29 मृत्यू हे गेल्या दोन-तीन (Maharashtra Total Corona Cases) दिवसातले आहेत.
राज्यात आज दिवसभरात 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 10 हजार 744 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 5 हजार 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 56 हजार 49 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 59,102 वर
मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 67 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 59 हजार 201 वर पोहोचली आहे. तर, आज दिवसभरात एकूण 68 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 248 जणांचा मृत्यू झाला आहे (Maharashtra Total Corona Cases).
आज दिवसभरात 3 हजार 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईतील 30 हजार 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त?https://t.co/ygHbNHibZ4 #CoronavirusIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 15, 2020
Maharashtra Total Corona Cases
संबंधित बातम्या :
Pune | पुण्यात परप्रांतीय प्रवाशी, मजुरांचा ओघ, 15 दिवसात 13 हजार परप्रांतीय दाखल