बदलत्या पर्यटन धोरणाची नांदी; राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन

| Updated on: Feb 04, 2021 | 6:13 PM

पर्यटन संचलनालयाकडून येत्या काही दिवसांमध्ये 20 ठिकाणी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. (Tourism Festival Maharashtra )

बदलत्या पर्यटन धोरणाची नांदी; राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन
महाराष्ट्र पर्यटन
Follow us on

मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्याच्या पर्यटन विभाग सक्रिय झाल्याचं चित्र आहे. राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवांमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टींग महोत्सव, नांदूर मधमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसेच धुळे जिल्ह्यात लळींग किल्ला महोत्सवाचा समावेश आहे. (Maharashtra Tourism Directorates will organize twenty tourism festival)

पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर द्राक्ष महोत्सव, सातारा जिल्ह्यात वाई महोत्सव तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा महोत्सवाचा अनुभव घेता येईल.कोकणामध्ये सिंधदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला (सागरेश्वर) महोत्सव, रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन महोत्सव, रत्नागिरी जिल्ह्यात कातळशिल्प महोत्सव तसेच वेळास/आंजर्ले महोत्सवाचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

औरंगाबाद विभागाने काही लोकप्रिय महोत्सवांचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात तेर महोत्सव, बीड जिल्ह्यामधील कपिलधारा महोत्सव तसेच नांदेड जिल्ह्यातील होट्टल महोत्सवाचा समावेश आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा महोत्सव, अकोला जिल्हात नरनाळा किल्ला महोत्सव तसेच यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

नागपूर विभागाकडूनही विविध महोत्सवांचे आयोजन होणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक महोत्सव, बोर धरण आणि वन्यजीव महोत्सव आणि गोंदिया जिल्ह्यातील बोधलकसा पक्षी महोत्सव यांचा समावेश आहे.

फारशी लोकप्रिय नसलेली ठिकाणे पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश

पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन महोत्सवांविषयी अधिक माहिती दिली.  राज्यातील फारशी लोकप्रिय नसलेली ठिकाणे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश आहे. कोरोनाचा संकटकाळ अतिशय कठीण होता. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना पर्यटकांचे स्वागत करण्याकरीता महाराष्ट्राने तयारी केली आहे. राज्याची भटकंती करण्याची संधी या महोत्सवातून उपलब्ध करून देण्यात आली असून महाराष्ट्र समजून घेता यावा या उद्देशाने पर्यटकांना महोत्सवात सामील होण्याचे आवाहन करत आहोत. राज्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा आणि राज्याचे सौंदर्य या महोत्सवांतून पाहण्याची संधी यानिमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे. या महोत्सवांचे आयोजन पर्यटन संचलनालयाच्या प्रादेशिक कार्यालयांच्या वतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने करण्यात येईल., असे त्यांनी सांगितले.

जेल टुरिझम ते   मुंबई महापालिकेतील हेरिटेज वॉक

महाराष्ट्रात पर्यटनाचं स्वरुप बदलत आहे. अशी अनेक ठिकाणं होती की त्या ठिकाणी कितीही जावं वाटलं तरी जाता जायचं नाही कारण ती ठिकाणं सर्वसामान्यांना खुली नव्हती. यामध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेलं येरवडा जेल आणि मुंबई महापालिकेची इमारत या दोन्हीही वास्तू राज्य सरकारने सर्वसामान्यांना खुली करुन नरजेआड असणारं वैभव आता जगासमोर आणलं आहे.

संबंधित बातम्या:

Special Story : महाराष्ट्राच्या बदलत्या पर्यटनाची नांदी, जेल टूरिझम ते हेरिटेज वॉक!

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

(Maharashtra Tourism Directorate will organize twenty tourism festival)