ही लढाई हिंदुत्वाची… मतदानानंतर केतकी चितळेचा Video व्हायरल, तुम्ही पाहीला का?

| Updated on: Nov 20, 2024 | 10:45 PM

Ketaki Chitale Viral Video : आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत आणि वादात अडकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिचा आजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मतदानानंतर तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात तिने ही लढाई हिंदुत्वाची असल्याचे म्हटले आहे.

ही लढाई हिंदुत्वाची... मतदानानंतर केतकी चितळेचा Video व्हायरल, तुम्ही पाहीला का?
केतकी चितळे
Follow us on

केतकी चितळे ही अभिनेत्री महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायम चर्चेत आणि वादात अडकली होती. तिने केलेल्या वक्तव्यामुळे तीने तत्कालीन सरकारची नाराजी ओढावून घेतली होती. आज एका रिक्षात बसून तिने मतदाना झाल्यानंतरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने बोटाला शाई दाखवून मतदान केल्याचे सूचीत केले आहे. त्याचवेळी तिने ही लढाई हिंदुत्वाची असल्याचे म्हटले आहे. तर आपल्याला धर्म वाचावायचा आहे, असे आवाहन सुद्धा तिने केले आहे. केतकीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काय म्हणाली केतकी?

केतकीचा व्हिडिओ व्हायरल

हे सुद्धा वाचा

केतकी चितळे ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या काही पोस्ट या एका पक्षाच्या बाजूने झुकल्याचे दिसून येते. त्यावरून महाविकास आघाडीची सत्ता असताना ती वादात अडकली होती. ती महाविकास आघाडीच्या नेत्यावर अनेकदा तोंडसूख घेताना दिसली आहे. आज तिने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काय म्हणाली केतकी, तिने काय केले आवाहन?

केतकी चितळेचा व्हिडिओ काय?

केतकी चितळे हिने आज मतदान केल्यानंतर हा व्हिडिओ काढल्याचे दिसते. एका रिक्षात तिने हा व्हिडिओ काढला आहे. त्यात ती मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवत आहे. “मी माझं मत दान केले आहे. तुम्ही केलं का? नसेल केलं तर मतदान जरूर करा. ही लढाई हिंदुत्वाची आहे. आपल्याला धर्म वाचावायचा आहे. जर लव्ह जिहाद होऊ शकतं. लँड जिहाद होऊ शकतं आणि वोट जिहाद होऊ शकतं. सरळ म्हणतायंत वोट जिहाद.. तर मग आपणंही लढलं पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी…हर हर महादेव.” असं वक्तव्य तिने या व्हिडिओत केलं आहे.

तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या मताला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिच्या धर्म वाचावायचा आहे, या मुद्दावर आम्हाला लोकशाही वाचावायची आहे, असे कमेंट केली आहे. यापूर्वी पण तिने अनेक व्हिडिओतून तिची बिनधास्त मतं मांडली आहेत. त्यावर तिला लोकांनी सुनावलं पण आहे. तर काही व्हिडिओमुळे ती अडचणीत आली आहे.