राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे या वादावर अजित पवार यांना सुनावले आहे. अनेक दशके अजित पवार अशा विचारधारेसोबत आहेत, जे धर्मनिरपेक्ष आणि हिंदू विरोधी आहेत. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे वास्तविक धर्मनिरपेक्ष नाहीत, अशा लोकांसोबत अजितदादा राहिले आहेत. त्यांच्यासाठी हिंदुत्वाला विरोध हीच धर्मनिरपेक्षता असल्याचे फडणवीस म्हणाले.
त्यांना जनतेचा मूड…
त्यांना जनतेचा मूड समजायला थोडा वेळ लागेल. लोक एकतर जनतेच्या भावना ओळखू शकले नाही अथवा या वक्तव्याचा अर्थ समजू शकले नाहीत. अथवा त्यांना बोलताना काही तरी वेगळंच सांगायचं होतं, असं वक्तव्य फडणवीस यांनी अजितदादांचा उल्लेख करताना केला. त्यांनी बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्दावर अजितदादा आणि फडणवीस यांचे एकमत नसल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसचा ओबीसी विभाजनाचा डाव
महाराष्ट्रात काँग्रेसचा ओबीसी विभाजनाचा डाव आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत त्याचे संकेत दिले आहे. राज्यघटना आणि आरक्षणावर अमेरिकेत त्यांचे वक्तव्य त्यांची मानसिकता समोर आणते. ज्याप्रमाणे काँग्रेस लोकांना जातीत विभाजनाचा प्रयत्न करत आहे, पंतप्रधान मोदी यांनी योग्य नारा दिला आहे. महाराष्ट्रात ओबीसीमध्ये 350 जाती आहेत. या सर्व जाती मिळून ओबीसी समाज तयार होतो. हा एक दबाव समूह आहे, त्याचे कल्याण व्हायला पाहिजे, असे मत फडणवीस यांनी मांडले.
भारत जोडो नाही तोडो
जर ओबीसीमधील 350 जाती विभागल्या गेल्या तर त्यांचा दबाव गट उपयोगी ठरणार नाही. त्यांचा दबाव संपून जाईल. ज्याप्रकारे भारत जोडोची स्थापन झाली. तो अराजक निर्माण करणारा समूह आहे. ते भारत जोडो आंदोलन नाही तर भारताला समाज समाजात विभागणारा गट आहे. हा समूह भारताला तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.