महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेत येईल, असे ते म्हणाले. आता प्रचाराचा धुरळा खाली बसायला दोन दिवस उरले आहेत. त्यापूर्वी टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना त्यांनी अनेक मुद्दावर त्यांची थेट मतं मांडली. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावर आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधावर त्यांची बाजू मांडली.
राज्यात कोणताच खेला नाही
टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने राज्यात चांगल्या योजना आणल्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे 23 तारखेनंतर राज्यात काही मोठा खेला, गेम होईल असे आपल्याला वाटतं नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमच्या ताकदीवर आम्ही बहुमत खेचून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बटेंगे तो कटेंगेवर थेट मत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बंटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्यावर नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केले. माझ्या समजुतीनुसार, आपण जात, धर्म, भाषा आणि लिंग या आधावर विभागले जाऊ नये. आपण उलट संघटित झालं पाहिजे. आपण भारतीय आहोत आणि आपल्याला एकसंध राहायला हवे, असा त्यांचा संदेश आहे. त्यांनी सांगितले की आपण वेगवेगळे पक्ष आहोत आणि आपण युती केली आहे. आपण एक पक्ष आहोत, तर आपले एकच विचार मांडले गेले पाहिजे. प्रत्येक पक्षाची एक खास गोष्ट आहे. हे राजकारणात चालते आणि त्यामुळेच ही युती आहे, असे मत गडकरींनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंविषयी काय मत?
उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. राजकारणात आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाहीत. विचारांच्या आधारावर आमच्यात मतभेद आहेत. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही विचारांच्या आधारावर एकमेकांविरुद्ध असू, अशी माझी समजूत आहे. निवडणुकीत सर्वच पक्ष मतदारांना मतदानासाठी आवाहन करतात. मी पण काँग्रेसच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो, असे ते म्हणाले. खरंतर निवडणुकीत कामगिरीवर चर्चा व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.