Devendra Fadnavis : राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागली? शरद पवार यांचा काय रोल होता?; देवेंद्र फडणवीस यांनी केला आजवर न झालेला गौप्यस्फोट

| Updated on: Nov 15, 2024 | 11:21 AM

President Rule in Maharashatra 2019 : राज्यात 2019 मध्ये राजकारणातील सर्वात नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली. भल्या पहाटे शपथविधी झाला. औटघटकेचे सरकार आले. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं. त्यात राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Devendra Fadnavis : राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागली? शरद पवार यांचा काय रोल होता?; देवेंद्र फडणवीस यांनी केला आजवर न झालेला गौप्यस्फोट
Follow us on

2109 या वर्षाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी घडली. या वर्षात अनेक वेगवान घडामोडी घडल्या. अल्पघटिकेचं सरकार अस्तित्वात आलं. त्यापूर्वी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. तर त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यालाच नाही तर देशाला राजकारणातील चमत्कार दाखवला. त्यानंतरच्या अडीच वर्षातही राजकारणात अनेक मोठे धक्के बसले. पण या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.

शरद पवार यांच्यावर निशाणा

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे 2019 मध्ये शरद पवार यांनी राज्यपालांना पत्र पाठवले. त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आले, असा दावा फडणवीस यांनी केला. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले फडणवीस?

” त्यावेळी भाजपाकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या. आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापण्यसाठी बोलावलं. त्यांच्याकडंही बहुमत नव्हतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत सरकार स्थापन करू इच्छित असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर लागलीच एक बैठक झाली. त्या बैठकीला मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पत्र माझ्या कार्यालयात टाईप केलं

राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी पवारांची सूचना होती. त्याप्रमाणे या गोष्टी घडल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पवारांनी त्यात काही बदल सूचवले होते. आता शरद पवार जर राज्यात राष्ट्रपती राजवट करणे हे त्यांच्या योजनेचा भाग नव्हता असे म्हणत असले तरी त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.