Sharad Pawar : शरद पवारांना सतावतेय ही चिंता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आवाहन, म्हणाले आमच्या जागा तरी वाढतील

| Updated on: Nov 17, 2024 | 10:05 AM

Sharad Pawar on PM Narendra Modi : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा आता खाली बसणार आहे. यावेळी सुद्धा जागा वाटपाचे गुर्‍हाळ लांबले. त्यामुळे प्रचाराला पक्षांना वेळ मिळाला नाही. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या गोष्टी हुरहुर लागली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे आवाहन केले आहे.

Sharad Pawar : शरद पवारांना सतावतेय ही चिंता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आवाहन, म्हणाले आमच्या जागा तरी वाढतील
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराचा धुरळा खाली बसेल. जागा वाटपाचे गुर्‍हाळ लांबले. त्यामुळे उमेदवारांना म्हणावा तितका वेळ प्रचाराला मिळाला नाही. अधिकृत उमेदवार, बंडखोर, तिसरी आघाडी, वंचित, अपक्ष यांच्यामुळे अनेक मतदारसंघात खिचडी झाली आहे. मतदारांसमोर मोठा संभ्रम आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने आक्रमक प्रचार केला होता. सर्वच पक्षांनी बराच संयम ठेवला आहे. प्रचारात विरोधाची धार दिसली नाही. प्रचारात तेच मुद्दे समोर आले आहेत. प्रचार संपत आला असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एका गोष्टींची हुरहुर लागली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबंधी खास आवाहन केले आहे.

लोकसभेत पंतप्रधानांचा मोठा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात शरद पवरांवर मोठी टीका केली होती. पवारांना भटकती आत्मा म्हटले होते. त्यानंतर पवारांच्या बाजूने सहानभुतीची लाट फिरली. 10 जागांपैकी 8 जागांवर पवारांचे उमेदवार विजयी झाले. अजित पवार यांना या टीकेचा फटका बसला. अजित पवारांनी सुद्धा या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

बारामतीत पंतप्रधानांची सभा नको

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वा इतर नेत्याची बारामतीत सभेची गरज नसल्याची भूमिका अजित पवार यांनी जाहीर केली. बारामतीत पंतप्रधानांची सभा नको हा मोठा संदेश अजितदादांनी दिला. राज्यात मोदींच्या सभा झाल्या. पण त्यात त्यांनी पवारांवर टीका करण्याचे टाळले. त्यावरून आता एकच चर्चा रंगली आहे. पंतप्रधानांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल केला. पण पवारांना त्यांनी टीका केली नाही.

शरद पवार यांनी काढला चिमटा

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. हा माझ्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे की, पंतप्रधानांनी यावेळी माझ्यावर टीका केली नाही. टिप्पणी केली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली, त्यावेळी आमच्या जागा वाढल्या. त्यामुळे मी मोदींना राज्यात प्रचाराचं निमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्रात यावं आणि माझ्यावर टीका आणि टिप्पणी करावी. त्यामुळे आमच्या जागा तरी वाढतील, असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला.