महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?

| Updated on: Nov 15, 2024 | 6:04 PM

Mahavikas Aaghadi CM : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून सध्या खल सुरू आहे. त्याची चर्चा सुरू आहे. अर्थात यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नावरून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सबुरीचा मंत्र जपला.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार
Follow us on

महायुतीचा मुख्यमंत्री हा संख्याबळावर ठरणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून सध्या खल सुरू आहे. त्याची चर्चा सुरू आहे. अर्थात यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नावरून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सबुरीचा मंत्र जपला. तर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत संख्याबळावर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरणार असल्याचा दावा केला होता. त्यावर आता शरद पवार यांनी स्वत: मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

स्ट्राईक रेट काय आहे. लोकसभेत दहा जागा लढवल्या. आठ जिंकल्या. स्ट्राईक रेट काय आहे. जागा किती लढवल्या हे महत्त्वाचं नाही. किती निवडून येतील हे महत्त्वाचं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी चेहऱ्याची गरज होती. ते मत व्यक्त केलं. आता परिस्थिती वेगळी आहे. निकाल लागू द्या. जागा किती येतात ते पाहू द्या. सरकार येऊ द्या, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांना लगावला टोला

फडणवीस यांच्या दाव्यानंतर राज्यात चर्चेचे काहूर उठले. या दाव्याच्या अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा, “मी फडणवीस यांचा आभारी आहे. मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे अधिकारी नाही. मी सांगितल्यावर प्रेसिडेंट रुल लागतो. त्यामुळे त्यांनी समजलं पाहिजे माझं स्थान काय आहे.” असा भीमटोला पवारांनी हाणला. काहीच अधिकार नसताना जर राज्यपाल माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागू करत असतील तर याचा अर्थ फडणवीस यांनी माझं स्थान ओळखायला हवं, असा चिमटा काढत त्यांनी या मुद्दातील हवाच काढून घेतली.

दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका

वर्तन काय भूमीका काय. त्यांच्याबद्दलची मते वेगळी होती. त्यांच्यावर विश्वास होता. प्रचंड विश्वास होता. त्यांनी दुसरा निर्णय घेतलाय त्यामुळे आम्ही स्पष्ट बोललो. त्यांनी स्पष्ट बोलायला पाहिजे होतं. लोकांची मागणी होती. त्यांच्याबद्दल सहानुभूती लोकांच्या मनात आहे. त्यामुळे सत्य बोला आणि स्पष्ट सांगा, असे ते म्हणाले.

गद्दार म्हणालो त्यात काही विशेष नाही. त्यांनी निवडणुका कुणाच्या नावाने लढवल्या, मते कुणी मागितली. कुणाच्या विरोधात मते मागितली, भाजपच्या विरोधात लढायचं मते मागायची आणि लोकांची आणि भाजपसोबत जायचं ही लोकांची फसवणूक नाही का असा सवाल शरद पवार यांनी केला.