Maharashtra Election 2024 : महाराष्ट्राच्या महानिवडणुकीची काय तयारी; कधी होतील तारखा घोषीत, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

| Updated on: Sep 28, 2024 | 4:27 PM

Maharashatra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. आज दिल्लीत निवडणूक आयोगाने या महा निवडणुकीसाठी काय काय तयारी सुरू आहे. काय काय सुविधा देण्यात येणार आहे, याची उजळणी केली. आता राजकीय पक्षांना निवडणूक तारीख कधी जाहीर होतील याची उत्सुकता लागली आहे.

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्राच्या महानिवडणुकीची काय तयारी; कधी होतील तारखा घोषीत, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
महा निवडणुकीचा लवकरच बिगुल
Follow us on

महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आज दिल्लीत निवडणूक आयोगाने या महा निवडणुकीसाठी काय काय तयारी सुरू आहे. काय काय सुविधा देण्यात येणार आहे, याची उजळणी केली. आता राजकीय पक्षांना निवडणूक तारीख कधी जाहीर होतील याची उत्सुकता लागली आहे. राजकीय पक्षांनी याविषयी त्यांच्या सूचना आयोगासमोर मांडल्या आहेत.

कधी होणार निवडणूक?

दोन दिवसांपासून राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण, उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं पडलं आहे. आम्ही ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. निवडणूक आयोग आता राजकीय पक्षांच्या या सूचनांच्या आधारे निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे. त्याविषयीची निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे. साधारणतः सण-उत्सव टाळून निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्षांची मागणी काय काय

पैशाची ताकद रोखण्याची विनंती काही पक्षांनी केली. पोलिंग स्टेशन दूर आहेत. वृद्धांना येण्या जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी केली. पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा अशी काही पक्षांची विनंती केली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची मागणीही पक्षाने केली आहे. फेक न्यूज रोखण्याची मागणी त्यांनी केली. फेक न्यूज कसे रोखणार याची माहिती आम्ही दिल्याचे आयोगाने स्पष्ट केले. सगळ्या पक्षाची मागणी आहे की अधिकाऱ्यांच्या बदल्या.योग्य व्हाव्यात. पैशांचा वापर योग्य व्हावा. वृद्धांसाठी वेगळी सुविधा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. पोलींग बूथ वर योग्य माणूस द्या, तिथल्याच मतदार संघाचा असावा. जे रेट्स सांगितले ते व्यवस्थित असावे, अशा ही मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाची मोठी कवायत

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मोठी कवायत केली आहे. वेब कास्टिंग ५०% बूथ वर होणार आहे. शहरी भागातील मतदान केंद्रावर १००% सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न करण्यात आहे. शौचालयची सुविधा असेल, पाणी पिण्यासाठी असेल. जिकडे लांब रांग असेल तिथे खुर्चीची व्यवस्था असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सोयी-सुविधा देण्यात येईल. घरी जाऊन मतदान घेण्याविषयी प्रयत्न करण्यात येईल. Saksham App तयार करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जे लागेल ते प्रयत्न करु, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.