महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. काल मतदान झालं आहे. शनिवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात 65. 02 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या बाजूने मतदान करणार? यावर सत्तास्थापनेचं गणित अवलंबून असणार आहे. महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर यंदा मतदान केलं आहे. त्यामुळे महिलांची मतं कुणाच्या पारड्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेला हा मतदानाचा टक्का कुणाच्या बाजूने असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. महिलांनी केलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने महिलांवर प्रभाव टाकल्याचं दिसतं. पण अशाच प्रकारची योजना आणण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं आहे. प्रतिमहिना तीन हजार रूपये महिलांना दिले जाणार असल्याचा शब्द महाविकास आघाडीने दिला आहे. त्यामुळे महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच पहिल्यांदा मतदान करणारी तरूण पिढी कुणाच्या बाजूने कौल देणार? यावर निकाल अवलंबून असेल.
पुण्यात यंदा मतदानाच्या टक्केवारी वाढ झाली आहे. वाढलेल्या मतांचा लाभ कुणाला होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांत सरासरी ६९ टक्के मतदान झालं आहे. तर शहरी भागातील ८ मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा सहा टक्के मतदान शहरात वाढले आहेत. सर्वाधिक ७६.९३ टक्के मतदान इंदापूर तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल बारामती आणि मावळ मतदारसंघात ७२ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात 67.97 टक्के मतदान झालं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 05.37 टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन माजी मंत्री, एक विधानसभा उपाध्यक्ष यांच्यासह 196 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. सर्वाधिक 78.01 टक्के मतदान दिंडोरी मतदार संघात झालं आहे. तर सर्वात कमी 56.08 टक्के मतदान नाशिक मध्य मतदारसंघात झालं आहे. 2019 मध्ये महिलांचे मतदान 56.06 टक्के, तर 2024 मध्ये महिलांचे मतदान 66.96 टक्के होते. महिलांच्या मतदानामध्ये यंदा 9.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.