मुंबई : गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे हैराण झालेल्या (Maharashtra Weather Report) राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. आज राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण राहणार नसून कुठेही पावसाच्या सरी कोसळणार नाही. मात्र, काही ठिकाणी हवेत गारवा राहणार आहे. तर, राज्यातील अनेक भागात कडक ऊन पडणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे (Maharashtra Weather Report).
Significant reduction in rainfall activity over Maharashtra from today. Though today possibility of isolated rainfall activity over parts of Konkan and Madhya Maharashtra, thereafter dry weather expected with clear skies?️☀️ pic.twitter.com/y91qpkJVw4
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) January 10, 2021
गेल्या आठवड्याभरात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. 9 जानेवारीपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हावामान विभागाने वर्तवला होता. मात्र, आज राज्यात कडक ऊन पडलं आहे. मुंबईसह उपनगरात हवामान आकाश स्वच्छ राहणार आहे. आज मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे, मुंबईत सध्या 30 अंश सेल्सिअस तामपानाची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभर वातावरणात कुठलाही बदल होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
मुंबईत शनिवारी रात्री ते रविवारच्या सकाळपर्यंत हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. मात्र, त्यानंतर मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे.
राज्यातील औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी महत्त्वाच्या शहरांमध्येही आज पावसाचा अंदाज नाही. कालपर्यंत जिथे ढगाळ वातावरण आणि पाऊस होता तिथे आज कडक ऊन पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज्यातील थंडीलाही ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे (Maharashtra Weather Report).
Pl see how temperatures in Mumbai varied in last 3 days from 8 to 10 Jan 2021.
Min temp didn’t show much variation, but max temp has jumped from 28-29 to 33-34 Deg C.
Cloudy sky to light rains changed today to Sunny sky and rise in daytime temperature.
Red line is today’s.
TC pic.twitter.com/1NejKrt5D1— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 10, 2021
गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने राज्यातील जनतेला हैराण केलं होतं. तसेच, अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी भाजपने केली आहे (Maharashtra Weather Report).
काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला
मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.
Weather Update : कोकणासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेतhttps://t.co/4BA9uyv776#WeatherUpdate #weather #Rain #imd #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2021
Maharashtra Weather Report
संबंधित बातम्या :
Weather Report | शनिवारी पाऊस, मंगळवारी थंडी, बाहेर पडण्याआधी हा हवामान रिपोर्ट वाचा
Weather Alert | राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांवर संकट