“लोकशाहीमध्ये असं घडू नये पण हे महाराष्ट्रातच घडतं”; संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना नेमका काय निरोप दिला…

| Updated on: Dec 15, 2022 | 6:01 PM

माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर उद्याच्या महामोर्चाची तयारी करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे.

लोकशाहीमध्ये असं घडू नये पण हे महाराष्ट्रातच घडतं; संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना नेमका काय निरोप दिला...
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडी आणि मित्र पक्षातर्फे उद्या सरकार विरोधात महामोर्चा निघणार आहे. मात्र पोलिसांनी महामोर्चाला परवानगी देत आहेत, मात्र वेगवेगळ्या अटी घालून विरोधकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या या भूमिकेबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, विरोधकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. आणि हे महाराष्ट्रात घडत आहे हे दुर्देवी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शिंदे-फडणवीस सरकारकडून विरोधकांचा आवाज कसा दाबला जातो आहे. हे सांगताना खासदार संजय राऊत यांनी लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला दिला.

संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले की, ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. ज्यांनी लोकशाही जन्माला घातली. त्या राज्यात सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशी जोरदार टीका शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी केली.

माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर उद्याच्या महामोर्चाची तयारी करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीत आता उद्याच्या महामोर्चासाठी काय निर्णय होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारकडून महामोर्चाला परवानगी देताना वेगवेगळ्या अटी आणि नियम लावून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे विरोधकांकडून लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार या सरकाकरकडून केला जात असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी महामोर्चाविषयी बोलताना सांगितले की, हा महामोर्चा निघणार आहे. मात्र सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही सरकारच्या कारभाराविरोधात महामोर्चा निघणार असल्याचे मत त्यांनी मांडले.