मुंबईः पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तीनही नेत्यांबरोबर चर्चा केली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी या व्यक्त केले. शिवसेना मागे जाते, पुढं जाते की तिथेच राहते यापेक्षा या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी जिंकणे ही गोष्ट महत्वाचे असल्याचेही सुभाष देसाई यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, ही निवडणूक फक्त ठाकरे गटासाठी महत्वाची नाही तर महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
त्यामुळे ही निवडणूक जिंकायची कशी त्यासाठी तीनही पक्षाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच बरोबर मित्र पक्षांना बरोबर घेऊन याबाबत नेमकी दिशा ठरवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या दोन पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण तापले आहे. त्यामध्ये आता महाविकास आघाडी एकत्रच लढणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. कारण गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे.
त्याबाबत विचारले असता सुभाष देसाई यांनी स्पष्टच सांगितले की, आमच्यामध्ये कोणतेही गटतट राहिले नाहीत. तर दोन्ही गट एकत्रच लढणार असून त्याबाबतची आता वरिष्ठ नेत्यांबरोबर एकत्रच चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि घटक पक्षांची एकत्र बैठक झाली आहे. पोटनिवडणुकीबाबत योग्य चर्चा झाली आहे. त्यामुळे आज प्रत्येक पक्षातील नेते त्या त्या पक्ष प्रमुखांबरोबर बोलून घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आपला निर्णय उद्या जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.