Chagan Bhujbal : 33 वर्षांपूर्वी शिवसेनेला भगदाड, नागपूरमध्ये कॅबिनेट पदाची माळ, यंदा मात्र छगन भुजबळांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

| Updated on: Dec 15, 2024 | 5:21 PM

Chagan Bhujbal Nagpur : मराठा आंदोलनावेळी राज्यात ओबीसी नेतृत्वाची धुरा छगन भुजबळ यांनी सांभाळली. मराठवाड्यात ओबीसी परीषद घेत त्यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला प्रखर विरोध केला. महायुतीच्या कॅबिनेटमध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्याने 33 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या शपथविधीची चर्चा होत आहे...

Chagan Bhujbal : 33 वर्षांपूर्वी शिवसेनेला भगदाड, नागपूरमध्ये कॅबिनेट पदाची माळ, यंदा मात्र छगन भुजबळांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ
छगन भुजबल, अजित पवार
Follow us on

राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी प्रखर होताच, छगन भुजबळ मैदानात उतरले. त्यांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्यात ओबीसी परिषद आणि सभा घेतल्या. राज्यात मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण झाले. छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. यापूर्वीच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते होते. महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल अशी अखेरपर्यंत त्यांच्या समर्थकांना आशा होती. पण त्यांचा पत्ता कट झाला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या यादीत त्यांना डच्चू देण्यात आला. या कॅबिनेटमध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्याने 33 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या नागपूर येथील शपथविधीची चर्चा होत आहे…

33 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ

मंडळ आयोगावरून 1991 मध्ये देशभरात वातावरण तापले होते. महाराष्ट्रात सुद्धा मंडल आयोगावरून वादळ आलं होते. त्यात छगन भुजबळ यांनी सुद्धा उडी घेतले. ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जायचे. पण त्यांनी मंडल आयोगाच्या मुद्दावरुन शिवसेनेला पहिले खिंडार पाडले. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

21 डिसेंबर 1991 रोजी राज्याची उपराजधानी नागपूरात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ हे सहभागी झाले. नागपूरमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. नागपूरमधील राजभवनात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत राजेंद्र गोडे, भरत बाहेकर, जयदत्त क्षीरसागर, शालिनी बोरसे, वसुधा देशमुख, शंकर नम या सहा जणांनी उपमंत्री म्हणून शपथ घेतली होती. नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना भुजबळ यांनी 11 सहकाऱ्यांसह शिवसेनेला भगदाड पाडले होते. या घटनेने राज्यात एकच गजहब झाला होता.

मंत्रिमंडळात मिळाला डच्चू

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. अनेकांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी कांग्रेसकडून 9 जणांची नावं देण्यात आली. त्यात छगन भुजबळ यांचे नाव नव्हते. आज 39 आमदारांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय़ भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद निश्चित झाले. तर छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला.

33 वर्षानंतर होणार्‍या शपथविधीत भुजबळ नाहीत

33 वर्षापूर्वी नागपूरमध्ये पहिल्यांदा शपथविधी सोहळा झाला होता. त्यावेळी छगन भुजबळ यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी कॅबिनेट, राज्य मंत्री आणि उपमंत्री अशी पदाची रचना होती. यावेळी दुसर्‍यांदा नागपूर येथे शपथविधी सोहळा होत आहे. पण त्यात भुजबळांच्या पहिल्या शपथविधीची चर्चा होत आहे.