कोरोना पाठोपाठ मुंबईवर आता ‘या’ आजाराचं संकट, दोघांचा मृत्यू

| Updated on: Aug 16, 2020 | 12:17 PM

कोरोनाच्या संकटातून मुंबई सावरत असतानाच आता मुंबईवर आणखी एक संकट घोंघावू लागले (Malaria and Dengue Patient increase Mumbai) आहे.

कोरोना पाठोपाठ मुंबईवर आता या आजाराचं संकट, दोघांचा मृत्यू
Traffic (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या संकटातून मुंबई सावरत असतानाच आता मुंबईवर आणखी एक संकट घोंघावू लागले (Malaria and Dengue Patient increase Mumbai) आहे. कोरोनानंतर आता मुंबईत मलेरियाची साथ पसरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे रुग्ण अधिक सापडल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत (Malaria and Dengue Patient increase Mumbai).

मुंबईत गेल्या वर्षी जुलै महिन्यात 438 मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे 872 रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरवर्षी जून आणि जुलै महिन्यांमध्ये मलेरियाची रुग्णसंख्या गेल्यावर्षीच्या तुलनेने दुप्पट होत असते. यंदाही जुलैमध्ये मलेरिया रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. तसेच यंदा दोन जणांचा मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही. त्यामुळे मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.

मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत डेंग्यूचे 29 रुग्ण सापडले होते. यंदा जुलैमध्ये 11 रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंग्यूचेही रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार असून या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षही सुरू करावं लागणार आहे.

मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2019 च्या जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या 994 रुग्ण होते त्यात आता केवळ 53 आहेत.

“एकीकडे कोरोना नियंत्रणात येत आहे तर दुसरीकडे पावसाळ्यात पसरणारे आजार पसरत आहेत. पालिका यंत्रणा पूर्णपणे यावर काम करत आहे. फक्त लोकांना जे नियम दिले आहेत त्याचे पालन त्यांनी करावे. कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. जेणेकरून मलेरिया आणि डेंग्यूच्या आळ्या तयार होणार नाहीत”, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मुंबई कोरोनामुक्त होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील?

Mumbai Corona Test | मुंबई ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी, 160 लोकांवर होणार चाचणी