Sharad Pawar ED LIVE : शरद पवार बारामतीकडे रवाना

| Updated on: Sep 27, 2019 | 3:06 PM

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर (money laundering sharad pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: आज ईडी कार्यालयात जाणार आहेत (Sharad Pawar ED office). मात्र, शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याअगोदर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Sharad Pawar ED LIVE : शरद पवार बारामतीकडे रवाना
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED office) यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब केला. खुद्द पवारांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली.  कायद्या आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय, मला ईडीकडून पत्र आलं होतं की चौकशीसाठी येऊ नये, असं पवार म्हणाले.

कालच्या 24 तारखेला मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आज मी ईडी कार्यालयात जाऊन त्यांना काही विनंती करणार आहे. विनंतीचं स्वरुप असं होतं, शिखर बँकेबाबत जो गुन्हा दाखल केला, त्या बँकेचा मी आयुष्यात संचालक, सभासद नव्हतो, अशात माझंही नाव समावेश करुन गुन्हा दाखल केला- शरद पवार

मी चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे, निवडणुकांमुळे मी महाराष्ट्र दौऱ्यावर असेन, त्यामुळे आधीच ईडी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न आहे. ईडीने मला पत्र पाठवून चौकशीची तूर्तास गरज नसल्याचं म्हटलं. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, त्याची प्रतिक्रिया जिल्ह्याजिल्ह्यात दिसत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिकट अवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करतोय, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

“याबाबत माझी हवं ते सहकार्य करण्याची माजी तयारी आहे. पण निवडणूक आयुक्ताने महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केल्याने, हा महिना महाराष्ट्रभर फिरण्यात जाईल. त्यामुळे मी मुंबईत नसेन. पण त्याचा अर्थ असा कुणी काढू नये की मी याला सामोरं जाण्यासाठी तयार नाही.

जो काय निर्णय घेतला, तो निर्णय हा राजकीय, एका विशिष्ठ परिस्थितीत विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांना जन माणसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याची आहे. म्हणून मी माझी भूमिका मांडण्यासाठी देण्यासाठी जाणार होतो. याबाबत लेखी सूचनाही ईडीला केली होती.

त्यांचं काल मला उत्तर आलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही. इथे येण्याची आवश्यकता नाही. पुढे जर कधी गरज पडली तर आम्ही पूर्वसूचना तुम्हाला देऊ, असं पत्र ईडीने पाठवलं.

याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्तांनी, विनंती केली. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. शहराशहरात-जिल्ह्यात संताप आहे. मुंबईत येणाऱ्यांना बाहेरच अडवलं जातंय, अशा तक्रारी आहेत. आयुक्तांनी विनंती केली की या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मी  स्वत: राज्यात अनेकदा गृहखातं सांभाळलं आहे. माझ्या एखाद्या कृतीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सामान्य माणसाला त्याची किंमत मोजण्याची वेळ यावी हे मला मंजूर नाही. त्यामुळे आता तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय”.

जमावबंदी

शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याअगोदर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करत मुंबईत जमावबंदी लावली आहे. पवार यांनी स्वत: ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. पवार ईडी कार्यालयात जाणार त्यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात गर्दी केली जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.

LIVE UPDATE :

[svt-event title=”कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता म्हणून निर्णय मागे – मुंडे” date=”27/09/2019,1:52PM” class=”svt-cd-green” ] ईडीने पवारसाहेबांना ई मेल केला, गरज पडली तर आम्ही तुम्हाला बोलवू अशी विनंती केली, मुंबई पोलीस आयुक्तांनीही विनंती केली. सबंध महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, साहेबांनी स्वत: गृहविभाग सांभाळला आहे. सामान्य माणसाला त्रास नको म्हणून निर्णय मागे घेतला – @dhananjay_munde [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,1:43PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”27/09/2019,1:42PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”27/09/2019,1:42PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”27/09/2019,1:41PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उत्तर द्यायला नाही, तर ईडीकडून उत्तर घ्यायला जाणार- नवाब मलिक ” date=”27/09/2019,1:12PM” class=”svt-cd-green” ] आम्ही उत्तर द्यायला नाही, तर ईडीकडून उत्तर घ्यायला जाणार आहोत, गुन्हा दाखल का केला याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्र्यांनी द्यावं, काही झालं तरी आम्ही ईडी कार्यालयात जाणार आहोत, ईडीने आम्हाला बोलवलं नव्हतं आम्ही स्वतः जात आहोत – नबाब मलिक [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांना ईडीचा ई मेल” date=”27/09/2019,12:54PM” class=”svt-cd-green” ] तूर्तास चौकशीची गरज नाही, असं पत्र ईडीने शरद पवारांना ई मेलद्वारे पाठवलं आहे. त्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.  [/svt-event]

[svt-event title=”ईडीची तयारी नव्हती तर पवारांचं नाव लिंक का केलं ? – भुजबळ” date=”27/09/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ] जर इडीची तयारी नव्हती तर पवारांचं नाव लिंक का केलं ? धरपकड होणार हे माहीत असल्यानेच कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत – छगन भुजबळ [/svt-event]

[svt-event title=”भुजबळ कुटुंब पवारांच्या घरी” date=”27/09/2019,11:30AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ,पंकज भुजबळ, समीर भुजबळ शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले #SharadPawar [/svt-event]

[svt-event title=”आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने – रुपाली चाकणकर” date=”27/09/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ] LIVE – शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई, आमच्या आंदोलनाने कोणालाही त्रास नाही, कायदा-सुव्यवस्था राखून लोकशाही मार्गाने आंदोलन – राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर @ChakankarSpeaks [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई : राहुल गांधी” date=”27/09/2019,11:19AM” class=”svt-cd-green” ] भाजपकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार हे आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत, महाराष्ट्र निवडणुकीच्या महिनाभरआधी कारवाई, सरकारच्या सूडभावनेचा निषेध, राहुल गांधींचं टीकास्त्र #SharadPawar [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊत यांचे आभार : जितेंद्र आव्हाड” date=”27/09/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार,अशा काळात पक्षभेद विसरून ते पाठीशी उभे, शरद पवारांनी 50 वर्षाच्या राजकारणात अनेक विरोधी पक्षनेत्यांना मदत केली आहे. त्यांनी द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. राऊत यांचा पाठिंबा म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे समजतो [/svt-event]

[svt-event title=” इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपविरोधात निदर्शने” date=”27/09/2019,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”हिंगोलीत रस्त्यावर टायर पेटवून निदर्शने” date=”27/09/2019,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कायदा सुव्यवस्था राखणं केवळ आमचं काम नाही : धनंजय मुंडे” date=”27/09/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार आणि राष्ट्रवादींच्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून कारवाई, या देशात लोकशाही आहे की नाही? शरद पवारांचं कुठंही नाव नाही, तरीही ईडीने कारवाई करणं हे भयंकर आणि सहनशीलतेपलिकडे. सामान्य माणसासाठी सदैव झटणाऱ्या नेत्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न, म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्यासारखं. कायदा सुव्यवस्था राखणं केवळ आमचं काम नाही, ते पोलीस आणि ईडीचेही काम आहे, शरद पवारांचं नाव गुन्ह्यात का? या देशातील लोकशाही धोक्यात आहे- धनंजय मुंडे [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ] पवारांचे कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर जमण्यास सुरुवात, परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात [/svt-event]

[svt-event title=”शासकीय यंत्रणांचा वापर राजकारणासाठी, भाजपवर संजय राऊत यांची टीका ” date=”27/09/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. बँकेत घोटाळा झाला त्यांना शासन झालेच पाहिजे. पण घोटाळ्यामध्ये नावच नाही तरी शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल होतो ही शंकेची बाब आहे. शासकीय यंत्रणांचा वापर राजकारणासाठी होत असेल तर हे फार चुकीचे आहे, असं संजय राऊत म्हणाले. [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ] कायदा सुव्यवस्थेसाठी सहआयुक्त विनायक चौबे शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओक येथे पोहोचले [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,9:54AM” class=”svt-cd-green” ] कायदा सुव्यवस्थेसाठी सहआयुक्त चौबे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे काहीच वेळात पोहोचणार [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ] ईडीची प्रेस नोट ही भाजपच्या कार्यलयातून निघाली, भाजप ईडीचा गैरवापर करत आहे, तक्रारदार अरोरा संघाचे कार्यकर्ते, आम्ही भाजपला घाबरणार नाही, परिस्थितीशी दोन हात करण्याची आमची तयारी : नवाब मलिक [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] आमची भूमिका ठाम आम्ही ईडी कार्यालयासमोर जाणार : नवाब मलिक [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”27/09/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार हे मलबारहील येथील सिल्वर ओक इथल्या घरुन दुपारी एक ते दीडच्या सुमारास ईडी कार्यालयाकडे निघतील [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक इथल्या निवास्थानी कार्यकर्त्यांची लगबग सुरू, रोहित पवार यांनी सकाळीच पवारांची भेट घेतली [/svt-event]

[svt-event date=”27/09/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांनी थेट सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेत शरद पवार साहेबांवर घातलेलं षड्यंत्र दूर करावे असं साकडं घातलं [/svt-event]

 

मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

शरद पवार आज (27 सप्टेंबर) दुपारी दोन वाजता ईडीच्या मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर राहातील (Sharad Pawar ED office). दरम्यान, पवारांना ईडी कार्यालयाकडून बोलवण्यात आलेलं नाही ते स्वत:हून कार्यालयात जाणार असल्याने त्यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार, अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील 25 हजार कोटींच्या या व्यवहारात पैशांचा लाभ कुणाला हा तपासाचा मुख्य भाग आहे.

हेही वाचा : ईडीकडून झाडाझडती, चौकशीचे तीन टप्पे, दुसरा टप्पा अजित पवार, तिसरा टप्पा शरद पवार, पहिला कोण?

ईडीने शरद पवारांना अद्याप चौकशीला बोलावलेलं नाही. तर शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडीचे मुंबईचे सहसंचालक शरद पवारांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. केवळ अर्धा तास ते तासाभरात पवारांना ईडीमधून सोडलं जाईल, अशीही माहिती आहे

ईडी प्रश्न विचारणार नाही

दरम्यान, शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जातील. मात्र, ईडीकडून त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. ईडीने अद्याप पवारांसाठीची प्रश्नावली तयार केलेली नाही. ईडीने अद्याप पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलेला नाही. चौकशीसाठी कुणाला हजर करायचे हा तपास अधिकाऱ्याचा विशेषाधिकार असतो आणि त्यासाठी ठोस कारणं हवी असतात. सध्या ईडी या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करत असून, जबाब नोंदवण्यात येत आहेत. त्यामुळे आवश्यकता भासेल, तेव्हा पवार यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.

ईडीने शरद पवार, अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप तपास अधिकाऱ्याचीही नेमणूक केलेली नाही. त्यामुळे ईडी आज शरद पवारांना प्रश्न विचारणार नाही.

हेही वाचा : ईडीची कारवाई लहान मुलांच्या क्रिकेटसारखी, नातू रोहित पवारांचं तिरकस भाष्य

शरद पवारांवर गुन्हा का?

दरम्यान, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.