मुंबई : मनोज जरांगे पाटील अखेर, मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. मुंबईतून मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार करत जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून निघालेत. जरांगे पाटलांचं पत्नीनंही वाटेतच औक्षण केलं आणि यापुढेही जरांगेंच्या आंदोलनाला कायम साथ देणार, अशा भावना पत्नीनंही व्यक्त केल्या.
मनोज जरांगेंच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. 54 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जातप्रमाणपत्र मिळावं. गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वत सोयऱ्यांना मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारे जातप्रमाणपत्र द्या आणि तिसरी मागणी आहे, मराठ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्या. जानेवारीपर्यंत, जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिली होती. मात्र मागण्या मान्य न झाल्यानं आता छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही म्हणत जरांगे भावूक झालेत
जरांगे आणि मराठे जस जसे मुंबईच्या दिशेनं पुढे पुढे जातील, तसे मराठा बांधव पायी मोर्चात सहभागी होतील. 26 जानेवारीला मुंबईतला मराठ्यांचा आकडा तब्बल 3 कोटींचा असेल, असा दावा जरांगेंचा आहे. तरुण-तरुणी, म्हातारे एवढं काय महिलाही जरांगेंसोबत मुंबईच्या दिशेनं पायी निघाल्यात.
आतापर्यंत सरकारच्या वतीनं जरांगेंशी चर्चेला येणारे बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आता माझी सरकार म्हणून भूमिका संपली, असं रोखठोकपणे बच्चू कडू म्हणालेत. दिवसांचा कुठं पायी तर कुठं वाहनानं प्रवास करत 26 तारखेला मुंबईत दाखल होणार आहे.प हिला दिवस बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील मातोरीच्या डोंगरपट्ट्यात संपलाय.