मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूबाबतचं गुढ अजूनच वाढलं आहे. मनसुख हिरेन यांचा पी. एम. रिपोर्ट समोर आल्यानंतर हे गूढ वाढलं आहे. या रिपोर्टमधील मुद्दे जर बारकाईने वाचले तर यातील 5 शक्यता ज्या त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला नाही, या तर्काच्या जवळ जातात. पाहुयात हिरेन यांच्या PM रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय…?? (Mansukh Hiren Pm report Important point)
1) पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासामध्ये मनसुख हिरेन यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, जर हे खर असेल तर हिरेन यांच्या शरीरात आणि विशेषत: त्यांच्या दोन्ही फुफूसात पाणी भरलेलं असणं अपेक्षित आहे. बुडून मृत्यू होणाऱ्या व्यक्तीच्या पी एम रिपोर्टमध्ये ही बाब अतिशय महत्वाची असते, मात्र इथे नेमकं याउलट मनसुख हिरेन यांची दोन्ही फुफुसं ही पुर्णत: रिकामी असल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे. जे खुपच अनपेक्षित आहे. याचाच अर्थ मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाला की नाही? यावर असुनही प्रश्नचिन्हच आहे.
2) मनसुख हिरेन यांच्या चेहऱ्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला झालेल्या जखमा, नाकाजवळ असणारी जखम आणि पाठीवरची जखम या सर्व जखमा या शवविच्छेदनापूर्वीच झाल्या असल्याचा स्पष्टपणे उल्लेख या पी. एम. रिपोर्टमध्ये करण्यात आल्या आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाण्यात पडताना किंवा पडल्यावर अश्या पद्धतीच्या जखमा होणं शक्य नाही.
3) मनसुख हिरेन यांची डेडबॉडी बाहेर काढणाऱ्यांनी त्यांच्या तोंडावर मास्कच्या आत 4 ते 5 रूमाल बांधले होते असा जबाब दिलाय. जर हे खरं असेल तर मनसुख हिरेन यांच्या हत्येची शक्यता जास्त बळावते.
4) पी. एम. रिपोर्टच्या अहवालानुसार मनसुख हिरेन यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमा या शवविच्छेदनापुर्वीच्या आहेत, जर अस असेल तर संशयित हल्लेखोराच्या हाताचे ठसे किंवा नखांच्या खुना या चेहऱ्यावर, गळ्याजवळ किंवा शरीरावर आढळल्या आहेत का? याबाबत पी. एम. रिपोर्टमध्ये काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही.
5 ) संपूर्ण पी. एम. रिपोर्ट आणि मृतदेहाची एकंदरीत अवस्था पाहता मनसुख हिरेन यांचा मृत्यू हा खाडीत बुडून नाही तर इतर अज्ञात ठिकाणी झाला असून त्यानंतर त्यांचा मृतदेह हा खाडीत फेकण्यात आला असावा याची जास्त शक्यता बळावते आहे.
(Mansukh Hiren Pm report Important point)
हे ही वाचा :
Mansukh Hiren Death Case | एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा हत्येच्या अँगलनं तपास करणार
मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?
मनसुख हिरेन यांच्या डोळ्यावर, पाठीवर जखमा, मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता